Lokmat Sakhi >Fitness > मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा... 

मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा... 

Fitness Tips by Malaika Arora: बैठं काम करून करून अनेकांची मान- पाठ एक होऊन जाते. आणि मग सतत मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखीचा (back pain) त्रास होऊ लागतो. त्यासाठीच करून बघा मलायका अरोरा सांगतेय तो ट्विस्ट योगा (Benefits of twisting yoga poses).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 08:17 AM2023-01-11T08:17:36+5:302023-01-11T08:20:01+5:30

Fitness Tips by Malaika Arora: बैठं काम करून करून अनेकांची मान- पाठ एक होऊन जाते. आणि मग सतत मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखीचा (back pain) त्रास होऊ लागतो. त्यासाठीच करून बघा मलायका अरोरा सांगतेय तो ट्विस्ट योगा (Benefits of twisting yoga poses).

Suffering from back pain? stiffness in spine? Must try twisting yoga poses- Fitness tips by Malaika Arora | मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा... 

मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा... 

Highlightsमूड चांगला होण्यासाठीही हा व्यायाम फायदेशीर ठरतो.  पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी उपयुक्त व्यायाम

८- १० तास सतत एकाच अवस्थेत बसून लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करणं चेष्टा नाही. यामुळे मग बॉडी पोश्चर बदलतं आणि त्याचा त्रास होऊ लागतो. मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर आखडून जाणं असे अनेक त्रास त्यातून उद्भवतात. आजकाल अशा पद्धतीच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्यांची संख्या खूप जास्त दिसून येते. तुम्हालाही अशाच पद्धतीचा त्रास होत असेल तर त्यावर फिटनेस फ्रिक मलायका अरोरा हिने एक व्यायाम सांगितला आहे. ट्विस्ट योगा म्हणून ती या व्यायामाचा उल्लेख करते आहे.

आपल्याला माहितीच आहे की मलायका प्रत्येक आठवड्यात तिच्या चाहत्यांना एक फिटनेस मोटीव्हेशन देत असते. यामध्ये ती त्यांना एखादा व्यायाम करुन दाखवते आणि त्याचे फायदेही समजावून सांगते.

बाळाला सांभाळत ऑफिसचं काम, सीईओ आईची कमाल! लेकरू सांभाळत कामाची कसरत..

मलायकाने अशाच पद्धतीचा एक वर्कआऊट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून twisting yoga poses अशा पद्धतीचा तो व्यायाम आहे. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अशा पद्धतीचा ट्विस्ट योगा उपयुक्त असल्याचंही ती सांगते. 

 

कसा करायचा ट्विस्ट योगा?
हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर पाय समोर लांबवून बसा. त्यानंतर उजवा पाय वर उचला आणि त्याचा अंगठा डाव्या हाताने पकडा.

संक्रांत स्पेशल रांगाेळी डिझाईन्स, छोट्या जागेतही झटपट काढता येईल आकर्षक- सुबक रांगोळी

शरीर संपूर्णपणे उजव्या बाजुला वळवा आणि उजवा हात मागच्या बाजूला घेऊन नजर त्या हातावर केंद्रित करा. ही आसन स्थिती २० ते २५ सेकंद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर अशाच पद्धतीने डावा पाय उचलून दुसऱ्या बाजुनेही व्यायाम करा. हा व्यायाम करताना शरीराला एक प्रकारचा पीळ बसतो. त्यामुळे याला twisting yoga म्हटले जाते.

 

ट्विस्ट योगा करण्याचे फायदे
१. पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी उपयुक्त व्यायाम

२. पाठ आखडून गेली असल्यास फायदेशीर व्यायाम.

अक्षयकुमार सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट- म्हणाला फिट रहायचं असेल तर जेवणाचं हे १ पथ्य पाळाच...

३. कंबरदुखीसाठी उपयुक्त.

४. मूड चांगला होण्यासाठीही हा व्यायाम फायदेशीर ठरतो.  
 

Web Title: Suffering from back pain? stiffness in spine? Must try twisting yoga poses- Fitness tips by Malaika Arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.