Lokmat Sakhi >Fitness > महिलांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत का? महिलांनी सूर्यनमस्कार घालण्याचे नक्की फायदे काय?

महिलांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत का? महिलांनी सूर्यनमस्कार घालण्याचे नक्की फायदे काय?

करीना कपूर सूर्यनमस्कार घालते त्याची केवढी चर्चा, पण मग आपण सूर्यनमस्कार का घालत नाही या प्रश्नाचं आहे काही उत्तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 03:40 PM2022-03-19T15:40:49+5:302022-03-19T15:44:01+5:30

करीना कपूर सूर्यनमस्कार घालते त्याची केवढी चर्चा, पण मग आपण सूर्यनमस्कार का घालत नाही या प्रश्नाचं आहे काही उत्तर?

Sun Salutation : How many Surya Namaskar should be done in a day? should women do Surya Namaskar | महिलांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत का? महिलांनी सूर्यनमस्कार घालण्याचे नक्की फायदे काय?

महिलांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत का? महिलांनी सूर्यनमस्कार घालण्याचे नक्की फायदे काय?

Highlightsवाढलेलं वजन, पीसीओडीचा त्रास, भूकेचं बिघडलेलं चक्र हे सारंही सूर्यनमस्काराच्या नियमित चक्राने कमी होतं.

नेहा बेलसरे

करीना कपूर सूर्यनमस्कार घालते त्याची केवढी चर्चा, कायम त्याच्या बातम्या, तिच्या झिरो फिगरचे कौतुक होते. मलायका अरोरा न चुकता सूर्यनमस्कार घालते. मात्र असं सगळं वाचून अनेकींची पहिली प्रतिक्रिया असते त्यांना कामं काय असतात? सतरा नोकर हाताखाली. आपल्याला घरकाम, ऑफिस सगळं सांभाळून नी डबे करुन कसला वेळ मिळतो सूर्यनमस्कार घालायला? हे सारं बोलणं म्हणजे जो सर्वांग सूंदर आणि मोफत व्यायाम आहे, प्रचंड असरदार आहे. आपल्या पाळीच्या प्रश्नांपासून ते वजनवाढीपर्यंत अनेक गोष्टींवर सूर्यनमस्कार केल्यानं चांगला उपयोग होऊ शकतो, हे सारं माहिती असूनही केवळ आळस आणि स्वत:ला अजिबात प्रायॉरिटी न देणं यामुळे इतका सोपा, सहज शक्य, केवळ बारा-पंधरा मिनिटात होणारा व्यायाम बायका करत नाहीत. खरंतर आपल्याला दिवसभर फ्रेश ठेवण्याचं आपल्या आरोग्याची घसरलेली गाडी पून्हा लायनीवर  आणायचं काम सूर्यनमस्कार करतात, मुद्दा एवढाच की आपण स्वत:ला प्रायॉरिटी देणार का?


 

महिलांनी सूर्य नमस्कार घालणं का आवश्यक आहे?

१. सूर्य नमस्कार एकतरी घरच्या घरी करता येतात, मोफत आहेत. त्यासाठी वेळ फार लागत नाही. शरीराची लवचिकता वाढते, हाडं बळकट होतात आणि मानदुखी-कंबरदुखी- हे आजार होत नाहीत.
२. त्वचा उत्तम होते, फ्लेक्झिबिलीटी वाढल्यानं कामातली चपळता वाढते.
३. पोट कमी होतं, मांड्या, पाठ, पोट यावर अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होते.
४. रक्तपुरवठा सुरळीत होतो.  केस गळणं, लवकर पांढरे होणं या तक्रारी कमी होतात.
५. स्ट्रेस कमी व्हायला मदत होते.
६. वाढलेलं वजन, पीसीओडीचा त्रास, भूकेचं बिघडलेलं चक्र हे सारंही सूर्यनमस्काराच्या नियमित चक्राने कमी होतं.

किती सूर्यनमस्कार रोज घालावेत?


अगदी एका सूर्यनमस्कारापासून सुरुवात करावी. मग तीन, मग पाच असं करत १०० सूर्यनमस्कारही तुम्ही घालू शकता. मात्र नियमित करायचे तर रोज किमान १२ सूर्यनमस्कार तरी सुरुवातीला घालायलाच हवेत. त्यासाठी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.

Web Title: Sun Salutation : How many Surya Namaskar should be done in a day? should women do Surya Namaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.