Lokmat Sakhi >Fitness > सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

Suniel Shetty Speaks About His Fitness Mantra : सुनील शेट्टी अजूनही दिसतो सुपरफिट कारण, त्याचे ३ नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 03:47 PM2024-08-27T15:47:05+5:302024-08-27T15:48:52+5:30

Suniel Shetty Speaks About His Fitness Mantra : सुनील शेट्टी अजूनही दिसतो सुपरफिट कारण, त्याचे ३ नियम

Suniel Shetty Speaks About His Fitness Mantra | सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

सुनील शेट्टी हा एक असा अभिनेता आहे (Sunil Shetty). जो आपल्या अभिनय आणि फिटनेससाठी कायम लोकांमध्ये चर्चेत असतो. साठीनंतरही एवढं यंग दिसणं अनेकांना जमलेच असे नाही (Fitness). सुनील शेट्टी नेक्म फिट राहण्यासाठी काय करतो? काय खातो? साठीनंतरही त्याची त्वचा टवटवीत कशी दिसते? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आईल असतील (Weight Loss).

त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत आपल्या फिटनेसचं रहस्य शेअर केलं. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपलं दिनचर्य शेअर केलं आहे. जर आपल्यालाही फिट आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर, सुनील शेट्टीचं दिनचर्य फॉलो करून पाहा(Suniel Shetty Speaks About His Fitness Mantra).

५ वाजता उठून व्यायाम आणि योगा


मुलाखतीत सुनील शेट्टी सांगत आहेत की, ते रोज पहाटे ५ वाजता उठतात. ५ वाजता उठल्यानंतर सुनील शेट्टी आधी आंघोळ करतात, आणि नंतर जिमला जातात. जिम केल्यानंतर सुनील शेट्टी ब्रीदिंग एक्सरसाईजही करतात. जिममध्ये व्यायाम करताना सुनील शेट्टी फोनचा वापर टाळतात. त्यानंतर कुटुंबीयांसोबत वेळ घालवतात.

पालकांच्या ४ चुकांमुळे मुलं बिघडतात; श्री श्री रविशंकर सांगतात, मुलांना योग्य वळण लावायचं तर..

सकारात्मक दृष्टीकोन

नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक वातावरणात राहा. यामुळे दिवसभर आपल्याला अॅनर्जेटिक राहण्यास मदत होईल. आपल्या दिवसाची सुरुवात नेहमी लवकर उठून करा. यामुळे आपण दिवसभर अधिक प्रॉडक्टिव्ह राहाल. शिवाय कुटुंबीयांसोबतही अधिक वेळ घालवाल.

दिवाळीआधी वजन कमी करायचं? फिटनेस कोच सांगतात ७ सोप्या टिप्स; महिनाभरात दिसेल फरक

फिट राहण्यासाठी आहार


सुनील शेट्टी घरचं पौष्टीक आहार खाण्यास पसंती दर्शवतात. आपल्या आहारात ८०% जेवण आणि २०% लिक्विडचा समावेश करतात. शिवाय आहारातून त्यांनी दूध, पांढरा भात, साखर आणि मीठ वगळले. साखरेमुळे वजन वाढतं आणि गंभीर आजारांचाही धोका वाढतो. या गोष्टी फॉलो केल्यामुळेच ६१ व्या वर्षीही आपण इतके फिट असल्याचं सुनील सांगतात.

Web Title: Suniel Shetty Speaks About His Fitness Mantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.