Lokmat Sakhi >Fitness > करिना कपूरचा सुपरफिट योगा! फिटनेससाठी बघा कसा करतेय व्यायाम, याला म्हणतात मेहनत

करिना कपूरचा सुपरफिट योगा! फिटनेससाठी बघा कसा करतेय व्यायाम, याला म्हणतात मेहनत

Fitness Tips By Kareena Kapoor: करिना कपूरची ट्रेनर अंशुका (Anshuka) हिने करिनाचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केला आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 07:21 PM2022-09-10T19:21:05+5:302022-09-10T19:21:49+5:30

Fitness Tips By Kareena Kapoor: करिना कपूरची ट्रेनर अंशुका (Anshuka) हिने करिनाचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केला आहे. 

Superfit yoga by Kareena kapoor, Kareena is doing these exercises for maintaining fitness | करिना कपूरचा सुपरफिट योगा! फिटनेससाठी बघा कसा करतेय व्यायाम, याला म्हणतात मेहनत

करिना कपूरचा सुपरफिट योगा! फिटनेससाठी बघा कसा करतेय व्यायाम, याला म्हणतात मेहनत

Highlightsया व्यायाम प्रकारात ती कोणतंही एक प्रकारचं योगासन करताना दिसत नाहीये. तर दोन- तीन स्ट्रेचिंग प्रकार तिने एकत्र करून ती ते सलग करून दाखवत आहे. 

बॉलीवूडच्या ज्या काही फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहेत, त्यांच्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे करिना कपूर (Kareena kapoor). करिअरच्या सुरुवातीला ती अतिशय स्लिम- ट्रीम होती. बॉलीवूडमध्ये झीरो फिगर ही संकल्पना आणणारी आणि ती रुढ करणारी अभिनेत्री म्हणजे करिना कपूर. दोन्ही बाळंतपणं झाल्यानंतर करिनाचं वजन खूप जास्त वाढलेलं होतं. पण त्यानंतर मात्र तिने नियमित व्यायाम (exercise by Kareena kapoor) करून ते अल्पावधीतच कमी केलं आणि पुन्हा एकदा ती फिट (Fitness Tips By Kareena Kapoor), स्लिम म्हणून ओळखली जात आहे.

 

करिनाची फिटनेस ट्रेनर अंशुका हिने करिनाचा नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. यामध्ये ती व्यायाम करताना दिसते आहे. Flow with BEBO, Remix it now - show us how you flow! अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिली आहे. यामध्ये करिना जो काही व्यायाम करते आहे, त्याला तिने YogaFlows असं नाव दिलं आहे. या व्यायाम प्रकारात ती कोणतंही एक प्रकारचं योगासन करताना दिसत नाहीये. तर दोन- तीन स्ट्रेचिंग प्रकार तिने एकत्र करून ती ते सलग करून दाखवत आहे. 

 

कसा व्यायाम करतेय करिना...
- करिना जो काही व्यायाम करते आहे, ते सगळे व्यायाम प्रामुख्याने शरीराचे संतुलन टिकविण्यासाठी तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतील असे आहेत. 

अमेरिकन कॉर्न नव्हे, खा पांढरा देशी मका; त्याचे ५ जबरदस्त फायदे 

- सुरुवातीला ती एका पायावर संपूर्ण शरीराचा भार पेलून शरीर संतुलित करण्याचा प्रयत्न करते आहे, त्यानंतर तशाच प्रकारचा व्यायाम ती दुसऱ्या पायाने करते आहे.

- हा व्यायाम करण्यासाठी तिने सुरुवातीला तळहात जोडून छातीवर ठेवले. त्यानंतर एक पाय उचलून तो गुडघ्यात न वाकवता समोरच्या बाजूने सरळ केला. त्यानंतर तोच पाय गुडघ्यात वाकवला आणि त्याचा तळवा दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवला. अशा अवस्थेत ती खाली वाकली.

- नंतर असाच व्यायाम तिने दुसऱ्या पायानेही केला. 
 

Web Title: Superfit yoga by Kareena kapoor, Kareena is doing these exercises for maintaining fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.