Join us  

पोट, मांड्या-दंड थुलथुलीत दिसतात? 'इवल्याशा' बिया कमी करू शकतात तुमचं वजन..पण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2024 1:19 PM

Surprising Ways How Flaxseed Helps You Lose Weight : किचनमधल्या इवल्याशा बिया वजन कमी करण्यास करू शकतात मदत..

वजन कमी करण्यासाठी आहारात अनेक बदल केले जातात (Weight Loss Tea). खाण्याच्या पद्धतीपासून ते अन्नपदार्थांमध्ये बदल केल्याने वजन कमी करण्यास मदत होते (Fitness). वजन वाढलं की फक्त शरीर बेढप दिसत नसून, आरोग्याच्या निगडीत अनेक समस्याही निर्माण होतात (Flaxseeds). यामुळे मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, हृदयाच्या निगडीत आजार छळतात.

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण जिम, योग, व डाएटकडे बारकाईने लक्ष देतो. पण अनेक गोष्टी करूनही वाढलेलं वजन कमी होत नाही. जर आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, पोषणतज्ज्ञ ख्याती रूपाणी यांनी सांगितलेला अळशीचा चहा करून पाहा. शिवाय या चहातून आरोग्याला मिळणारे फायदे किती? पाहूयात(Surprising Ways How Flaxseed Helps You Lose Weight).

वेट लॉस करणारा चहा कसा करायचा?

लागणारं साहित्य

फ्लेक्स सीड्स

दालचिनी पावडर

लिंबाचा रस

पानं सतत पिवळी? रोपांना फळं - फुलंच येत नाही? उरलेल्या चहापत्तीचा करा 'असा' उपयोग'; झाड बहरेल

पाणी

वेट लॉस चहा करण्याची योग्य पद्धत

- वेट लॉस चहा तयार करण्यासाठी आधी गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात एक चमचा अळशीच्या बिया किंवा अळशीची पावडर घाला. ५ मिनिटांसाठी उकळवत ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा.

- चहाच्या गाळणीने गाळून पाणी एका ग्लासमध्ये काढून घ्या. त्यात लिंबाचा रस आणि छोटा अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपला वेट लॉस चहा पिण्यासाठी रेडी.

- आपण हा चहा सकाळी उपाशी पोटी पिऊ शकता. अळशीच्या बियांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय पचनक्रियाही सुधारते. 

अळशीचा चहा पिण्याचे फायदे

- अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

- या व्यतिरिक्त या बियांमध्ये  कॉपर, मँगनीज, प्रोटीन, ओमेगा - ३ असिड आणि अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

नाष्टा करणे बंद केल्याने वजन घटते? सकाळी ४ हेल्दी चविष्ट पदार्थ खा; वेटलॉसची गॅरंटी

- लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे ते त्वचेचे आरोग्य सुधारते. आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

- वेट लॉस ते केसांचे आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.

- दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकारकशक्तीला वाढवण्यास मदत होते. तसेच वजन नियंत्रित राहते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स