Join us  

सुष्मिता सेनचे डॉक्टर सांगतात, व्यायाम आठवड्यातून किती दिवस आणि कधी करावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 1:06 PM

Sushmita Sen's Cardiologist-Approved Workout Plan After Heart Attack व्यायाम न करणे आणि अती करणे दोन्ही आरोग्यासाठी वाईट कारण..

व्यायाम हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. कोरोना या वैश्विक महामारीनंतर प्रत्येकाला आपल्या आरोग्याचे महत्त्व पटले आहे. प्रत्येक जण वर्कआउट करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. या काळात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना गंभीर आजारांनी ग्रासले. या महिन्याच्या सुरुवातीलाच विश्व सुंदरी सुश्मिता सेन यांना हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु, फिजिकली एक्टिव्ह राहिल्याने त्यांचा जीव वाचला.

सुष्मिता सेनवर उपचार करणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजीव भागवत यांनी एका मुलाखतीत अभिनेत्रीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये त्यांनी सुष्मिता सेनचा जीव कसा वाचला, व व्यायामाबाबत लोकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगितले.

इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील कार्डिओलॉजिस्ट राजीव भागवत सांगतात, ''सुष्मिता सेन फिटनेस फ्रीक आहे, ती शारीरिकदृष्ट्या फार सक्रिय राहते. योग्यप्रकारे व्यायाम केल्याने सुष्मिता सेनला हृदयविकाराच्या झटक्याने कमी नुकसान झाले. सक्रिय शारीरिक जीवनामुळे लोकांच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात, यासह हृदयाचे आरोग्य मजबूत होते. व्यायाम योग्य प्रकारे केला तर आजारांना बऱ्याच अंशी आळा घालता येतो. परंतु, जिममध्ये जाऊन अधिक वेळ व्यायाम करणे, शरीराला आराम न देणे या गोष्टी शरीरासाठी घातक ठरू शकते''(Sushmita Sen's Cardiologist-Approved Workout Plan After Heart Attack).

‘मला व्हायचं होतं फिट म्हणून..’ लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात वजन कमी करणारी आलिया भट सांगते..

आठवड्यातून किती दिवस व्यायाम करावा?

कार्डिओलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, ''प्रत्येकाने आठवड्यातून फक्त ३ ते ४ दिवस व्यायाम केला पाहिजे. व्यायाम रोज करू नये. व्यायामानंतर, शरीराला व्यायामाच्या ताणातून सावरण्यासाठी वेळ दिला पाहिजे. जर शरीराला आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर, हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या निगडीत मोठे धोके निर्माण होऊ शकतात.''

टॅग्स :सुश्मिता सेनहृदयविकाराचा झटकाव्यायामहेल्थ टिप्स