Lokmat Sakhi >Fitness > स्विमिंग की सायकलिंग-वजन कमी करण्यासाठी उत्तम काय? सुटलेलं पोट सपाट होईल सपाट

स्विमिंग की सायकलिंग-वजन कमी करण्यासाठी उत्तम काय? सुटलेलं पोट सपाट होईल सपाट

Swimming Or Cycling Which Is Better For Weight Loss : कॅलरीज बर्न करणं खूपच सोपं काम आहे. मेडिकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसार स्विमिंग करून तुम्ही एका तासाला ५०० कॅलरीज बर्न करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:41 PM2024-05-17T15:41:54+5:302024-05-17T15:55:30+5:30

Swimming Or Cycling Which Is Better For Weight Loss : कॅलरीज बर्न करणं खूपच सोपं काम आहे. मेडिकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसार स्विमिंग करून तुम्ही एका तासाला ५०० कॅलरीज बर्न करू शकता.

Swimming Or Cycling Which Is Better For Weight Loss : Weight Loss Tips Swimming Cycling Benefits | स्विमिंग की सायकलिंग-वजन कमी करण्यासाठी उत्तम काय? सुटलेलं पोट सपाट होईल सपाट

स्विमिंग की सायकलिंग-वजन कमी करण्यासाठी उत्तम काय? सुटलेलं पोट सपाट होईल सपाट

वजन कमी करण्यासाठी लोक सायकलिंग किंवा स्विमिंगची निवड करतात. (Weight Loss Tips) लहानपणापासूनच काहीजण तासनतास सायकलिंग करतात.  सायकलिंग नियमित केल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. स्विमिंग हा  एक असा व्यायाम आहे ज्यामुळे संपूर्ण शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते आणि वजनही नियंत्रणात राहतं. याव्यतिरिक्त गरमीच्या वातावरणात काहीवेळ राहिल्याने बॉडी टेम्परेचर नॉर्मल राहण्यास मदत होते. लहान मुलांपासून तरूणांपर्यंत अनेकांमध्ये हा प्रकार वाढला आहे. सायकलिंग आणि स्विमिंगमध्ये किती फरक असतो ते समजून घेऊ. (Swimming Or Cycling Which Is Better For Weight Loss)

मानसिक आरोग्य 

१) पोहणं- सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एण्ड वेलनेसच्या रिपोर्टनुसार पाणी हृदय आणि मेंदूला शांतता प्रदान करते. जास्त जास्त लोक आपलं डोकं रिलॅक्स करण्यासाठी समुद्राजवळ जातात. ज्यामुळे शरीराला भरपूर एनर्जी मिळते. ताण-तणाव कमी होतो आणि मूड स्विंग्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

२) सायकलिंग - बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार सायकल चालवणारे लोक एक्टिव्ह असतात. असं दिसून येतं की आठवड्याला  ४ ते ५  दिवस सायकल चालवल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. 

आर्थरायटिससाठी गुणकारी

१) पोहणं- वेब एमडीच्या रिपोर्टनुसार ज्या लोकांना आर्थरायटिसचा त्रास असतो  त्यांनी एरोबिक व्यायाम करायला हवेत. ज्यामुळे वेदना कमी होता. याशिवाय सांधेदुखीच्या वेदना जाणवत नाहीत.   अशावेळी स्विमिंग फायदेशीर ठरतं. वार्म वॉटर व्यायाम केल्याने ओस्टिओपिरोसिसचा धोका कमी होतो. 

चालताना मांड्या घासल्या जातात-आग होते? ऋजुता दिवेकर सांगतात १ उपाय; जळजळ होईल दूर

२) सायकलिंग- जर तुम्ही आर्थरायटिसचे रुग्ण असाल तर सायकलिंग केल्यानंतर तुम्हाला वेदना जाणवू शकतात.  जास्तवेळ सायकलिंग केल्यामुळे सांधे दुखतात आणि असह्य्य वेदनाही जाणवतात.

कॅलरीज बर्न होतात

१) पोहणं- कॅलरीज बर्न करणं खूपच सोपं काम आहे. मेडिकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसार स्विमिंग करून तुम्ही एका तासाला ५०० कॅलरीज बर्न करू शकता. गरमीच्या दिवसांत स्विमिंग केल्यानं तुमचं शरीर थंड राहतं आणि अन्य आजारही उद्भवत नाहीत. 

दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती? पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही

२) सायकलिंग- सायकलिंग  एक प्रकारचा व्यायाम आहे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार  ७० किलो वजन असलेल्या व्यक्तीने जवळपास  ३० मिनिटं सायकलिंग करायला हवी. यामुळे  २२५ कॅलरीज बर्न होतात.

Web Title: Swimming Or Cycling Which Is Better For Weight Loss : Weight Loss Tips Swimming Cycling Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.