बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. कधी ट्रेंडिंग विषयांवरील तिच्या कमेंट्समुळे, तर कधी तिच्या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे तापसी प्रसिद्धी झोतात असते. तिने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तापसी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही हटके गोष्टी करते की ज्यामुळे ती नेहमी चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते.
आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू केवळ चांगल्या भूमिकाच करत नाही, तर तिच्या फिटनेसकडेही तेवढेच लक्ष देते. आपल्याकडे सौंदर्य आणि फिटनेसच्याबाबतीत वेगवेगळ्या अभिनेत्रींना फॉलो करण्याचा एक नवीन ट्रेंडच सुरु झाला आहे. या ट्रेंडिंग लिस्टमध्ये मलायका अरोरा - खान, करीना कपूर, सारा अली खान, दीपिका पदुकोण यांच्यासोबतच तापसी पन्नूचे नाव देतील जोडले जाते. तापसी जेवढी मेहेनत आपल्या अभिनयासाठी घेते, तेवढीच मेहेनत ती आपल्या फिटनेससाठी देखील घेताना दिसून येते. तापसीने हल्लीच तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन्सचे फोटोज व व्हिडीओ तिच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. तापसीने या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल (Munmun Ganeriwal) यांची मदत घेतली आहे(Taapsee Pannu Nutritionist Munmun Ganeriwal Share For Habits That Can Help In Reduce Weight).
वजन कमी करण्यासाठी तापसी पन्नूची सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल सांगतात काही खास टिप्स...
१. बॉलीवुड अभिनेत्री तापसी पन्नूची न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल (Munmun Ganeriwal) यांनी हल्लीच त्यांच्या ऑफिशियल इंस्टग्राम पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपले वजन कमी करण्यासाठी डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर आपण वजन कमी करू इच्छित असाल तर आपल्याला काहीही खाल्ल्यानंतर किमान १० मिनिटे तरी चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे.
आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...
२. यानंतर मुनमुन सांगतात की वजन कमी करण्यात पाण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे दिवसभरात आपल्या शरीराला आवश्यक असेल एवढे पाणी पिणे फारच गरजेचे आहे. शक्यतो फ्रिजमधील थंड पाणी पिणे टाळावे. नॉर्मल किंवा थोडे कोमट पाणी पिऊन स्वतःला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्याचा सल्ला त्या देतात. यासोबतच आपण गरम पाणी देखील पिऊ शकता. गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील व पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते.
३. मुनमुन गनेरीवाल (Munmun Ganeriwal) यांनी सांगितले की, तापसी पन्नू अॅथलेटिक फिगरसाठी कार्बोहायड्रेटयुक्त नाश्त्याने दिवसाची सुरुवात करते. उत्तम शरीरासाठी केवळ प्रोटीनचे सेवन महत्त्वाचे नाही, तर तुम्ही किती संतुलित आहार घेता हे देखील महत्त्वाचे आहे. तिच्या आहारात ती फायबरदेखील मोठ्या प्रमाणात घेते.
खूप वर्षे तरुण दिसायचंय-तरुण रहायचंय ? हार्वर्ड विद्यापीठाचा अभ्यास सांगतो ५ गोष्टी न चुकता करा...
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘उशीचे व्यायाम’! फिट होण्यासाठी पिलो एक्सरसाइजचा पाहा खास प्रयोग...
४. वजन कमी करण्यासाठी डाएट बरोबर असणे आवश्यक आहे आणि सोबत रूटीन वर्कआउट करणे देखील तितकेच आवश्यक असते. आपण प्रत्येक दिवशी हार्डकोर वर्कआउट करणेच गरजेचे आहे असे नाही, पण तुम्ही योगा, वॉक, रनिंग, सायकलिंग जसे एक्सरसाइज रोज करून तुमचे वजन कमी करू शकता.