Join us  

Yoga by Arjun Kapoor: मलायका अरोराकडे अर्जून कपूरने लावला योगाक्लास; पोश्चर सुधारण्यासाठी करतोय कोणती आसने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2022 3:31 PM

Fitness tips: गर्लफ्रेंड मलायका अरोराकडून प्रेरणा घेऊन आता अभिनेता अर्जून कपूरही (Yoga by Arjun Kapoor) योगाच्या मार्गावर चालत आहे... त्याने योगासने करतानाचे त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केले असून त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल (viral post) झाली आहे..

ठळक मुद्देएरवी जीममध्ये जाऊन घाम गाळताना दिसणारा अर्जून कपूर आज चक्क मलायकाकडून योगाचे धडे गिरवताना दिसतो आहे.

योगाअभ्यास, फिटनेस या गोष्टींमध्ये ज्यांचा हात कुणीही पकडू शकणार नाही, अशा मोजक्या अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आहेत. यापैकीच एक आहे मलायका अरोरा (Malaika Arora).. तिचे फिटनेस प्लॅन आणि ॲक्टीव्हिटी अतिशय जबरदस्त असून तिच्याकडून अनेक जणांना नेहमीच फिटनेस, योगा याविषयी प्रेरणा मिळत असते.. आता बाकीच्या लोकांना प्रेरणा मिळते म्हटल्यावर तिचा बॉयफ्रेंड अर्जून कपूर (Arjun Kapoor starts yoga) यापासून दूर कसा राहू शकेल...

 

प्यार का असर.. की काय म्हणतात.. तसंच झालं असून आता अर्जून कपूरनेही मलायकाकडून मोटीव्हेशन घेतलं आहे. एरवी जीममध्ये जाऊन घाम गाळताना दिसणारा अर्जून कपूर आज चक्क मलायकाकडून योगाचे धडे गिरवताना दिसतो आहे. त्याचे त्याची योगा करतानाची पोस्ट नुकतीच त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अय्यंगार योगा करण्याचा एक नवाच प्रवास आपण सुरू केला असून या प्रवासासाठी त्याने ज्या काही लोकांना क्रेडिट दिले आहे, त्यापैकी एक आहे त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा.. 

 

अर्जूनने जी पोस्ट शेअर केली आहे, त्यात तो असं म्हणतोय की तो ही आसने बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी, कंबरदुखी संदर्भातल्या समस्या सोडविण्यासाठी करत आहे.. हा त्रास कमी करण्यासाठी त्याने या दरम्यान ३ व्यायाम केले असून यापैकी पहिले आसन आहे उष्ट्रासन, दुसऱ्या आसनात त्याने एक पाद राजकपोतासन केले असून तिसऱ्या फोटोमध्ये तो वन लेग फॉरवर्ड बेंड करताना दिसतो आहे.. 

 

कंबरदुखीचा त्रास तर अनेक महिलांना नेहमीच छळत असतो.. तिशी नंतरची जवळपास प्रत्येक मैत्रिण या त्रासाने ग्रासलेली त्रस्त असते.. तसेच पाठीत बाक आल्यामुळे किंवा चालण्याची, बसण्याची, उभे राहण्याची पद्धत बदलल्यामुळे अनेक जणींचे बॉडी पोश्चरही चुकीचे होत असते. त्यामुळे आपला हा त्रास कमी करण्यासाठी अर्जून कपूर करतो आहे, त्याप्रमाणे उष्ट्रासन करून बघा.. नक्कीच चांगला फायदा होईल.

 

कसे करायचे उष्ट्रासन (how to do camel pose)उष्ट्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनात बसा. यानंतर गुडघ्यावर उभे रहा. आता एक हात एका बाजूने मागे नेऊन त्या हाताने त्याचा पायाचा घोटा पकडण्याचा प्रयत्न करा. आता डोके, मान, पाठ मागच्या दिशेने झुकवा आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या पायाचा घोटा पकडा. यामध्ये तुमची मान पुर्णपणे मागे झुकलेली असेल आणि पाठीला बाहेरील बाजूने curv आला असेल. ही आसनस्थिती ३० ते ३५ सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. हळूहळू आसनाची वेळ वाढवत न्या.

 

उष्ट्रासन करण्याचे फायदे - नियमितपणे उष्ट्रासन केल्यास पचनक्रिया सुधारते.- पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.- कंबरदुखी कमी होऊन तेथील स्नायू बळकट बनतात.- खांदेदुखीचा त्रासही कमी होतो.- पाठीच्या कण्याची लवचिकता वाढल्याने हे आसन बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी मदत करते.

 

एक पाद राजकपोतासन करण्याचे फायदे - मुत्रविकार कमी करण्यााठी हे आसन उपयुक्त आहे.- कंबरेचा त्रास कमी करण्यासाठी हे आसन करावे.- सायटिकाचा त्रासदेखील या आसनाने कमी होतो.- मानसिक त्रासही कमी होतो. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यअर्जुन कपूरमलायका अरोरासेलिब्रिटी