शरीराच्या चांगल्या कार्यासाठी तसंच उत्तम आरोग्यासाठी प्रोटीन्स महत्वाचे असतात. शाकाहारी लोक जास्तीत जास्त प्रोटिन्स मिळवण्यासाठी पनीरचे सेवन करतात. (Protein Rich Veg food) शरीरात प्रोटिन्सची कमतरता असल्यास हाडं कमकुवत होतात. टेम्पेह हे प्लांटबेस्ड फूड आहे यात जास्त प्रमाणात पनीर असते. हे व्हेजिटेरियन फूड सोयाबीनला फर्मेंट करून बनवलं जातं. टेम्पेह खायला चविष्ट असतं. ज्यात जास्तीत जास्त सोयाबीन वापरलं जातं. (Tempeh is high protein food which is more healthy than paneer and chicken know tempeh benefits)
चिकन आणि पनीर प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत असल्याचं सांगितलं जातं. पण आरोग्य तज्ज्ञ टेम्पेह या दोन्हींपेक्षा जास्त परिणामकारक असल्याचं सांगतात. युएसडीएच्या मते १०० ग्राम टेम्पेहमध्ये १९.०५ ग्राम प्रोटीन असते. जे चिकन आणि पनीरपेक्षा अजिबात कमी नाही. टेम्पेह खाल्यानं कोलेस्टेरॉल वाढत नाही. कारण ते एक लो फॅट फूड आहे. Luke Coutinho च्या मते यात हेल्दी फॅट्स असतात. यामुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.
फायबर्सनी परिपूर्ण
टेम्पेहमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. जे पनीर आणि चिकनमध्ये अजिबात नसतात. याच कारणामुळे टेम्पेह पोटासाठी चांगले असते. हे फायबर्स गट्समधील हेल्दी बॅक्टेरियांच्या वाढीस चालना देतात. याचे सेवन केल्यानं गॅस, अपचन, पोट फुगण्याच्या समस्या उद्भवत नाहीत. टोफू सोयाबीनपासून तयार होते. पण टेम्पेहमध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स जास्त प्रमाणात असतात म्हणून टोफू हेल्दी प्रोटीन मानले जाते.