Join us  

घ्या तुमच्या मसल फ्लेक्सिबिलिटीची परीक्षा, पास झालात तर तरुण आणि नापास झालात तर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 6:21 PM

घरात राहूनही आपण आपल्या लवचिकतेची परीक्षा सहज घेऊ शकतो. त्यासाठी खांदे, मणका,मान आणि खांदे, नितंब आणि गुडघे यांच्या हालचाली सहज होत आहेत ना हे तपासावं. हे तपासण्यासाठी काही व्यायाम प्रकार आहेत. ते नीट जमत आहेत का हे बघावं . आपलं शरीर लवचिक आहे की नाही याचं उत्तर सहज मिळेल.

ठळक मुद्देफिट राहाणं म्हणजे काय, तर वय वाढत असलं तरी आपलं शरीर त्या तुलनेत लवचिक असायला हवं. खांदे, मणका,मान आणि खांदे, नितंब आणि गुडघे यांच्या हालचाली सहज होत आहेत ना हे तपासावं. लवचिकतेच्या परीक्षेत नापास झालं तरी सराव करुन आपलं शरीर लवचिक करता येतं.

  फिट राहाणं म्हणजे काय. तर वय वाढत असलं तरी आपलं शरीर त्या तूलनेत लवचिक असायला हवं. आपल्याला वाटतं की आपण तसे आहोत पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते आणि ती आपल्याला माहितही नसते. त्यासाठी आपलं शरीर खरंच लवचिक आहे का हे वेळोवेळी तपासून पाहाणं फार गरजेचं आहे. तसं नसेल तर ती लवचिकता वाढवण्याचा प्रयत्न केला तर वय वाढत असलं तरी शरीर मात्र लवचिक असतं.आता ही लवचिकता तपासायची कशी?हे तपासण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. घरात राहूनही हे आपण सहज करु शकतो. त्यासाठी खांदे, मणका,मान आणि खांदे, नितंब आणि गुडघे यांच्या हालचाली सहज होत आहेत ना हे तपासावं. हे तपासण्यासाठी काही व्यायाम प्रकार आहेत. ते नीट जमत आहेत का हे बघावं . आपलं शरीर लवचिक आहे की नाही याचं उत्तर सहज मिळेल.

खांद्याची लवचिकतात्यासाठी खाली बसावं. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनात बसावं. दोन्ही हात मागे पाठीच्या बाजूस न्यावे. पाठीवर दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करावी. हा उलटा नमस्कार सहज, कोणताही अडथळा न येता, वेदना न होता जमला की आपण खांद्याच्या लवचिकता परीक्षेत पास झालो असं समजावं. हे जर नीट जमलं नाही, खांदे दुखले तर निराश न होता आपल्याला सरावाची गरज आहे हे समजावं. खांद्याची लवचिकता वाढवणारे स्ट्रेचिंगचे करावेत. त्यासाठी खाली बसावं. डावा हात पाठीवर आडवा किंवा उलटा उभा धरावा. आणि उजवा हात खांद्याच्या मागे न्यावा. दोन्ही हातांताची बोट एकमेकांना टेकवावीत. नंतर हाच व्यायाम दुसरा हात पाठीवर ठेवून करावा. हा व्यायाम पाच वेळा करावा. घाई करु नये. थोडा वेळ द्यावा. सरावानं खांदे लवचिक होतात आणि उलटा नमस्कारही सहज जमतो.

 

मणक्याची लवचिकता.मणक्याची लवचिकता तपासण्यासाठी दोन्ही पायांवर ताठ उभं राहावं. गुडघे न वाकवता खाली वाकावं. दोन्ही हात जमिनीवर किंवा हातांनी टाचा पकडाव्यात. कपाळ गुडघ्यांना टेकवावं. हे सहज जमतं का ते पाहावं. जमलं तर आपला मणका लवचिक आहे हे समजावं. नसल्यास मणक्याची लवचिकता वाढवणारे स्ट्रेचिंग करावेत. यासाठी योगसाधनेतील गरुडासन, अर्ध चक्रासन ही आसनं करावीत.

 खांदे आणि मानेची लवचिकतादोन्ही गूडघ्यांवर उठून ताठ बसावं. शरीर मागच्या दिशेनं झुकवावं. दोन्ही हात शरीराप्रमाणे मागे नेऊन हातांनी टाचा पकडाव्यात. हे सहज जमलं तर आपण अजून तरुण आहे हे समजावं. आणि हे जमलं नाही तर मग खांदे आणि मानेची लवचिकता वाढवणारे स्ट्रेचिंग व्यायाम करावेत. यासाठी योग साधनेतील भुजंगासन रोज पाच वेळा कराव . यामुळे खांदे आणि मानेची लवचिकता वाढेल.

नितंबाची लवचिकताआपले नितंब लवचिक आहे की नाही हे तपासण्यासाठी खाली बसावं. बसताना डावा पाय मांडीत दूमडावा. उजवा पाय सरळ ठेवावा. शरीर पूढ झुकवावं. दोन्ही हातांनी उजव्या पायाचे पाऊल धरुन कपाळ गुडघ्यांना टेकवावं. हेच उजवा पाय मांडीत दुमडून करावं. दोन्ही बाजूंनी हे छान जमलं तर नितंब लवचिक आहे हे समजावं. आणि हे जमलं नाही, अवघड गेलं तर नितंबांची लवचिकता वाढवण्यासठी स्ट्रेचिंग करावं. त्यासाठी दोन्ही पाय सरळ जमिनीवर पसरुन खाली बसावं. दोन्ही हातांनी पावलांना मिठी मारावी आणि कपाळ गुडध्यांवर टेकवावं. हे हळूहळू सरावानं जमतं. घाई करु नये.गुडघ्यांची लवचिकताआपले गुडघे लवचिक आहे की अवघडलेले हे पाहाण्यासाठी सरळ पुशअप्स मारुन बघाव्यात आणि तेही जलद. हे जर नीट जमलं तर गुडघे उत्तम लवचिक आहेत हे समजावं. नसल्यास गुडघ्यांची लवचिकता वाढवणारे स्ट्रेचिंग करावेत. यासाठी गुडघा वाकवण्याचे व्यायाम करावे. सरळ दोन्ही पायात अंतर ठेवून उभं राहावं. स्क्वॉटस करताना जितकं खाली जातो तेवढं जाऊन पुन्हा वर यावं. वर येताना डावा पायाचा गुडघा अर्ध गोल फिरवावा. असंच दुसऱ्या पायाचा  गुडघा फिरवण्यासाठी करावं. किंवा खाली पाठीवर झोपावं. एक पाय ताठ आणि दुसरा गुडघ्यात वाकवावा. दोन्ही हातांनी गुडध्यास मिठी मारावी. त्या स्थितीत काही सेकंद राहावे. आणि मग असाच व्यायाम दुसऱ्या गुडघ्याचा करावा.लवचिकतेची ही पाच प्रकारची परीक्षा घेतली तर आपण शरीरानं किती तरुण आहोत हे सहज ओळखता येईल. आणि नसू तर वेळीच सावध होऊन तरुण होण्यासाठी आणखी प्रयत्न करता येतील हे नक्की!