वजन वाढवणे (Weight Gain Tips) किंवा कमी करणे या दोन्ही गोष्टी एकाच रात्री घडत नाही (Weight Gain). काहींच वजन झपाट्यानं वाढतं तर, काहींना कमी करताना नाकीनऊ येतात (Health Tips). पण काहींचं खाऊनही वजन वाढत नाही. काही लोक वजन कमी होत नाही म्हणून प्रयत्न करतात (Weight Gain Fast). तर काही जण वजन वाढत नाही म्हणून नाराज असतात.
वजन वाढत नसल्यामुळे बरेच टोमणेही ऐकावे लागतात. वजन वाढवण्यासाठी काही लोक प्रोटीनचे डब्बे संपवतात. पण तरीही वजन वाढत नाही. वजन जर खाऊनही वाढत नसेल तर, आहारात ५ सुपरफूडचा समावेश करून पाहा. हे पदार्थ खाल्ल्यानंतर शरीर बेढब नसून, फिट आणि सुडौल दिसेल. निरोगी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत? पाहा(The 4 Best Healthy Foods to Gain Weight Fast).
कॅलरीयुक्त अन्न खा
वजन वाढत नाही अशी काही जण तक्रार करतात. पण आपण किती आणि काय खात आहोत? यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. जर आपलं वजन वाढत नसेल तर, कॅलरीयुक्त पदार्थ खा. ज्या पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असेल, ते पदार्थ खा. यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि वजनही वाढवण्यास मदत होते. आपण दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, पनीर, चीज असे पदार्थ खाऊ शकता.
छोट्या - छोट्या भागात अन्न विभागा
वेट गेन आणि वेट लॉस या दोन्हींमध्ये फूड डिस्ट्रीब्यूशन फार महत्वाचं आहे. दिवसभरात आपण ३ वेळ अन्न खातो. पण ३ वेळेस अन्न न खाता, त्याची अधिक विभागणी करू शकता. प्री-ब्रेकफास्ट, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता, सूप आणि रात्रीचे जेवण यासारख्या लहान पार्टसमध्ये डिवाईड करा. यामुळे वेट गेनसाठी मदत होईल.
केळी आणि दूध
केळी आणि दुधात जास्त प्रमाणात कॅलरीज असतात, जे वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण सकाळी केळी आणि दूध पिऊ शकता. केळीचा शेक पिऊ शकता. यामुळे वेट गेनसाठी मदत होईल.
सुटलेल्या पोटाची चरबी होईल झरझर कमी; फक्त चमचाभर मेथी दाणे 'या' पद्धतीने खा; वजन घटणारच
प्रोटीन रिच पदार्थ
आहारात प्रोटीन रिच पदार्थांचा समावेश करा. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने वेट गेनसाठी मदत होते. शिवाय मसल्सही वाढतात. प्रोटीनरिच फूड खाल्ल्यानंतर व्यायामही करणे गरजेचं आहे.