एका विशिष्ट वयानंतर महिलावर्ग बेली फॅटमुळे त्रस्त होतात. बेली फॅट वाढण्यामागे अनेक करणे असू शकतात. बिघडलेली जीवनशैली, असंतुलित हार्मोन्स शिवाय शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे, या कारणांमुळे पोटाची चरबी वाढत जाते. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे महिलांमध्ये मधुमेह, थायरॉईड, हृदयविकार इत्यादींचा धोका वाढतो, याशिवाय पीसीओएस सारख्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच आहाराकडे लक्षण देऊन, महिलांनी वजन कमी करायला हवे.
मात्र, अनेक उपाय करूनही अनेकदा पोटाची चरबी लवकर कमी होत नाही. हात-पाय सडपातळ होतात, पण पोटाची चरबी आहे तशीच राहते. त्यात काहीही फरक दिसून येत नाही. जर आपल्याला बेली फॅट कमी करायचं असेल तर, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितलेल्या ५ टिप्स फॉलो करून पाहा(The 5 Best Ways to Get a Flat Stomach).
गरम पाणी प्या
सकाळची सुरुवात नेहमी कोमट पाण्याने करा, व दिवसभर देखील कोमट पाणी पीत राहा. यामुळे शरीरातील फॅट्स मेल्ट, जेणेकरून पोटाची चरबीही झरझर घटेल. शिवाय पचन आणि चयापचय देखील बुस्ट होते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न लवकर पचतं.
वजन कमी आणि पचन सुधारण्यासाठी चिमुटभर हळदीचे २ सोपे उपाय, हळदीचा वापर आरोग्यासाठी वरदान
व्यायाम करा
वजन कमी करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणं खूप गरजेचं आहे. नियमित एक्सरसाईज केल्याने कॅलरीज बर्न होतात. आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी जीम, योगा, किंवा रनिंग-वॉकिंग करू शकता. दररोज किमान ४० ते ६० मिनिटं व्यायाम केल्याने पोटाची चरबी नक्कीच कमी होईल.
प्रथिनेयुक्त आहार घ्या
वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार खा. प्रोटीनयुक्त आहार खाल्ल्याने कॅलरीज बर्न होतात. आपल्या आहारात प्रोटीनशिवाय कार्ब्स आणि फॅट्सचा देखील समावेस करा. वजन कमी करताना संतुलित आहार खाणं गरजेचं. चपाती-भाजीसह आपल्या आहारात फळं, भाज्या, कडधान्ये, सॅलॅड यांचा नक्कीच समावेश करा.
झोप महत्वाची
वजन कमी करताना आराम करणं देखील तितकंच गरजेचं आहे, म्हणून तज्ज्ञ ८ ते १० तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराला रिकव्हरीसाठी मदत होते.
'मैने प्यार किया'तली सुमन आजही दिसते तरुण, पाहा तिचं सिक्रेट ग्रीन लंच- हिरव्यागार जेवणाची रंगत
हर्बल चहा प्या
जेवणानंतर १० ते १५ मिनिटांनतर हर्बल चहा प्या. आपण ग्रीन टी, कॅमोमाइल टी, जिऱ्याचे पाणी किंवा दालचिनीचा चहा पिऊ शकता. या चहांमुळे पचन सुधारते शिवाय चयापचय देखील बुस्ट होते. अशाने पोटाची चरबी झरझर कमी होऊ लागते.