Lokmat Sakhi >Fitness > जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट

जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट

The 5 main benefits of walking after eating : ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर, पोट होईल साफ; फक्त जेवणानंतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2024 01:53 PM2024-11-24T13:53:34+5:302024-11-24T13:56:51+5:30

The 5 main benefits of walking after eating : ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर, पोट होईल साफ; फक्त जेवणानंतर..

The 5 main benefits of walking after eating | जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट

जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट

बऱ्याच जणांना जेवणानंतर लगेच झोपण्याची किंवा बसण्याची सवय असते (Walking). पण या निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. खरंतर जेवणानंतर लगेच झोपू किंवा जेवायला बसू नये (Health Benefits). एकाच जागी जास्त वेळ बसल्याने शरीराभोवती आजार विळखा घालतात (Walking After Eating). यासह वजनही वाढते. वजन वाढलं की निश्चित गंभीर आजारांचा धोका वाढतो. अशावेळी पौष्टीक पदार्थ खाऊनही समस्या वाढू शकते. त्यामुळे जेवणानंतर काही चुका टाळलेले बरे.

जनरल फिजिशियन डॉ. पियुष मिश्रा सांगतात, 'रात्रीच्या जेवणानंतर चालण्याची सवय आपल्या दिनचर्येत समाविष्ट करा. अगदी काही पावले चालले तरी, वेट लॉससाठी मदत होऊ शकते. यासह अनेक गंभीर आजार दूर राहू शकतात.' चालल्याने वेट लॉस व्यतिरिक्त शरीराला आणखीन किती फायदे मिळतात?(The 5 main benefits of walking after eating).

पचन सुधारते

डिनर केल्यानंतर शक्यतो काही पावलं चाला. यामुळे पचनक्रिया गतिमान होते. नियमित चालल्याने अन्न लहान आतड्यात योग्यरित्या पोहोचण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर नियमित चालण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. यासह अॅसिडिटी, गॅसेस, पोट फुग्ण्याचा त्रास दूर होतो. त्यामुळे जेवणानंतर शक्यतो १५ मिनिटे चाला.

युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन

झोप चांगली लागते

बऱ्याचदा खराब जीवनशैलीमुळे झोपेचं चक्र बिघडते. बेडवर पडूनही तासंतास झोप लागत नसेल तर, पोटाचे विकार वाढतात. खाल्लेलं नीट पचत नाही. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने शारीरिकदृष्ट्या आपण तंदुरुस्त राहतो. यासह मानसिक आरोग्यही सुधारते.

वेट लॉससाठी मदत

आपण ऐकलं असेल चालल्याने कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी करण्यात खूप मदत होते. ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही. त्यांनी रात्रीचं शतपावली करावी. नियमित याची सवय लावल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढेल. ज्यामुळे शरीर अधिक कॅलरी बर्न होईल.

हृदय राहील निरोगी

शतपावली केल्याने हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. यासह बॅड कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते. नियमित चालल्याने ह्रदयाच्या निगडीत आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे रात्री जेवल्यानंतर आपल्या रुटीनमध्ये चालण्याचा समावेश करा.

दह्यात कांदा घालून खाता? मग गॅसेसचा त्रास होणारच; दही - कांदा एकत्र खात असाल तर..

किती वेळ चालल्याने होईल फायदा?

जेवणानंतर निदान १० मिनिटे चाला. जर आपल्याला पोटाचे विकार छळत असतील तर, नियमित जेवणानंतर चाला. दररोज १० मिनिटे चालल्याने आपण शारीरिक हालचाल करू शकता. हळूहळू १५ आणि ३० मिनिटे चाला. 

Web Title: The 5 main benefits of walking after eating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.