Lokmat Sakhi >Fitness > राधिका मर्चण्टची मेकअप आर्टिस्ट सांगतेय योगाचा एक भन्नाट प्रकार, आजार राहतील लांब - मूडही होतो छान...

राधिका मर्चण्टची मेकअप आर्टिस्ट सांगतेय योगाचा एक भन्नाट प्रकार, आजार राहतील लांब - मूडही होतो छान...

Benefits of Aqua Yoga : Ambanis bahu radhikas makeup artist loveleen aqua yoga video : निरोगी राहण्यासाठी तुम्ही अ‍ॅक्वा योगाचा सराव केला पाहिजे, हा योगा प्रकार केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 03:13 PM2024-07-13T15:13:02+5:302024-07-13T17:18:20+5:30

Benefits of Aqua Yoga : Ambanis bahu radhikas makeup artist loveleen aqua yoga video : निरोगी राहण्यासाठी तुम्ही अ‍ॅक्वा योगाचा सराव केला पाहिजे, हा योगा प्रकार केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात....

The Amazing Benefits Of Aqua Yoga ambanis bahu radhikas makeup artist loveleen aqua yoga video Benefits of Aqua Yoga | राधिका मर्चण्टची मेकअप आर्टिस्ट सांगतेय योगाचा एक भन्नाट प्रकार, आजार राहतील लांब - मूडही होतो छान...

राधिका मर्चण्टची मेकअप आर्टिस्ट सांगतेय योगाचा एक भन्नाट प्रकार, आजार राहतील लांब - मूडही होतो छान...

योगा केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते, आपला मूड फ्रेश होतो. आरोग्यतज्ज्ञ निरोगी राहण्यासाठी नियमित योगासने करण्याचा सल्ला देतात. योगा केल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते. आत्तापर्यंत आपण योगाचे वेगवेगळे प्रकार ऐकले असतील. अ‍ॅक्वा योगा (Aqua Yoga) हा देखील यापैकीच एक प्रकार आहे. अ‍ॅक्वा योगा म्हणजे थोडक्यात जल योगा. अ‍ॅक्वा योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. अ‍ॅक्वा योगा केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि स्ट्रेस दूर होतो. याचबरोबर आपले मनही शांत होते(The Amazing Benefits Of Aqua Yoga).

मुकेश अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंटची मेकअप (Mukesh Ambani's bahu Radhika Merchant's makeup artist,) आर्टिस्ट 'लवलीन रामचंदानी' देखील 'अ‍ॅक्वा योगा' करणे फायदेशीर मानते. लवलीनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती योगा टिचरच्या मदतीने पाण्यात योगा करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना लवलीनने तिच्या योगा टिचरचे आभार मानले आहेत. 'अ‍ॅक्वा योगा' (Benefits of Aqua Yoga) म्हणजे नेमके काय आणि ते करण्याचे अनेक फायदे काय आहेत, हे पाहूयात(Ambanis bahu radhikas makeup artist loveleen aqua yoga video). 

अ‍ॅक्वा योगा म्हणजे काय ?

अ‍ॅक्वा योगा या योगा प्रकारामध्ये पाण्याच्या आत राहून योगासने करावी लागतात. यामध्ये पाण्यात राहून अनेक प्रकारची योगासने आणि प्राणायाम करता येतात. प्रत्येक व्यक्ती निरोगी राहण्यासाठी अ‍ॅक्वा योगाचा सराव करु शकतात. अ‍ॅक्वा योगाचा थेट संबंध पाण्याशी आहे. याचा सराव करण्यासाठी पाण्याच्या आत राहून योगासने करावी लागतात. पाण्यामुळे शरीराच्या सांधे आणि स्नायूंवर खूप दबाव पडतो, परिणामी शरीर चांगले ताणले जाते आणि यामुळे आपल्याला हलके वाटते. अ‍ॅक्वा योगामध्ये, वृक्षासन, ताडासन, कोनासन, गरुडासन इत्यादींचा सराव पाण्यात राहून करता येतो. तणाव, चिंता, यकृत, मूत्रपिंड आणि हृदयाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हा योगा प्रकार फारच उपयुक्त मानला जातो. 

बॅटल रोप एक्सरसाइज म्हणजे काय?  ४ गोष्टी चुकल्या तर जन्मभराचे दुखणे लागेल मागे...

पावसाळ्यात आजारी पडून दवाखान्यात ॲडमिट व्हायचं नसेल तर करा ५ गोष्टी, आहारतज्ज्ञ सांगतात...

अ‍ॅक्वा योगा करण्याचे फायदे :-

१. अ‍ॅक्वा योगा केल्याने शरीर लवचिक बनते. तसेच हाडे आणि स्नायू मजबूत होतात. 

२. अ‍ॅक्वा योगा केल्याने शरीर ताणले जाते आणि स्नायूंवरील अतिरिक्त ताण कमी होतो.

३. शरीराचा समतोल राखणे सोपे जाते.

४. हा योगा प्रकार केल्याने नैराश्य दूर होते, यामुळे मन शांत होते.

५. जर तुम्हाला अंगदुखीचा त्रास होत असेल तर अ‍ॅक्वा योगाचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते, याचबरोबर हृदयाचे आरोग्यही सुधारते.

६. 'जर्नल ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी अँड हेल्थ' नुसार मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी रोज किमान १५ ते २० मिनिटे नियमितपणे अ‍ॅक्वा योगाचा सराव करावा. जर अ‍ॅक्वा योगाला तुमच्या जीवनाचा भाग बनवले तर ते मानसिक आरोग्य मजबूत करते.

 

Web Title: The Amazing Benefits Of Aqua Yoga ambanis bahu radhikas makeup artist loveleen aqua yoga video Benefits of Aqua Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.