'सायकलिंग' हा एक उत्तम एक्सरसाइज आहे असे अनेकजण म्हणतात. सायकल चालवण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि अनेक गोष्टी बदलत गेल्या. असंच काहीसं सायकलच्या बाबतीत देखील झालं आहे. बाईक आणि कारच्या जगात आजकाल लोकांना सायकल (Cycling - health benefits) चालवायला कमीपणा वाटतो. पूर्वीच्या काळी लोक खूप मोठी मोठी अंतर सायकलने(Health Benefits of Cycling) पार करत असत. परंतु आता लहानशा अंतरासाठी देखील आपल्याला बाईक लागते. या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला वेगाने पुढे जावेसे वाटते आणि सायकलने इतक्या लवकर अंतर कापता येत नाही हे खरे आहे, म्हणून लोक कमी अंतरासाठीही बाईक - कार वापरायला लागले आहेत(Why Cycling Is Good For Heart & Brain).
जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि तुमच्या मेंदू व हृदयाचे कार्य सुरळीत ठेवायचे असेल तर सायकलिंग करणे गरजेचे आहे. सायकल चालवून तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता, असे डॉक्टरांचे मत आहे. याबाबत आकाश हेल्थकेअर, नवी दिल्लीचे कार्डिओलॉजी विभागाचे संचालक, डॉ. आशिष अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे(THE BENEFITS OF CYCLING FOR PHYSICAL AND MENTAL HEALTH).
सायकलिंगमुळे मेंदू व हृदयाचे कार्य उत्तमरित्या चालते....
डॉ. आशिष अग्रवाल सांगतात की जे लोक सायकल चालवतात त्यांचे हृदय निरोगी असते.खरंतर, सायकलिंग हा एक प्रकारचा एरोबिक व्यायाम आहे. सायकलिंगमुळे भविष्यात हार्ट अटॅक येण्याचा धोका २५ ते ३० टक्क्यांनी कमी होतो. सायकलिंग केल्यामुळे वजन कमी होते. वजन कमी केल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते(cycling can reduce heart disease risk by a big margin).
८५ वर्षांच्या आहेत अभिनेत्री हेलन, पाहा त्या करतात तो भन्नाट व्यायाम, फिटनेसचं सिक्रेट...
सायकल चालवताना तुमचे हार्ट बीट वाढतात. ज्यामुळे हार्टरेट वाढून ह्रदयातील रक्ताचे पंपिग वाढते. सहाजिकच यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरात रक्ताचा योग्य प्रमाणात पूरवठा होतो. ह्रदयाचे कार्य सुरळीत झाल्यामुळे शरीरातील कॅलरीज योग्य प्रमाणात बर्न होतात. तुमचे वजन नियंत्रणात राहण्यात मदत होते. ज्यामुळे तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होण्याचा आणि ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.
सायकल चालवणे केवळ तुमच्या शारीरिकच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही ( How to improve your physical and mental well-being) चांगले असते. सायकल चालवल्याने मेंदूचे आरोग्य, मनःस्थिती सुधारते आणि ऊर्जा पातळी सुधारते. या गोष्टी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. तणाव आणि नैराश्यापासून दूर राहण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम पर्याय आहे. सायकल चालवल्याने मेंदूतील व संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने केले जाते.
खरंच, जस्सी जैसी कोई नही! अवघ्या ६ महिन्यांत मोना सिंगने १५ किलो वजन कमी केलं..
वजन तर कमी केलं पण ते पुन्हा वाढू नये म्हणून ४ सोप्या टिप्स, वजन वाढणार नाही...
त्याचबरोबर सायकल चालवल्याने तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते. याचा मेंदूतील रक्तप्रवाहावर सकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे मेंदूमध्ये जास्त ऑक्सिजन पोहोचतो. अशा प्रकारे मेंदूच्या नवीन पेशी तयार करण्यासाठी अधिक प्रथिने तयार होतात. यामुळे तुमची स्मरणशक्ती देखील वाढते.
व्यायामाचा तुमच्या शरीराप्रमाणे मनावरही चांगला परिणाम होतो. कारण व्यायामामुळे तुमच्या मेंदूचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल झाल्यामुळे शरीरातील हॉर्मोन्स संतुलित राहातात. ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागते.