वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. मुख्य म्हणजे जिम आणि डाएटकडे विशेष लक्ष देतो. व्यायाम करण्याचे अनेक प्रकार आहेत. पण काही जणांना व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. जर आपल्याला व्यामाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर, वॉक करूनही आपण कॅलरीज कमी करू शकता.
अनेक अभ्यासात असे आढळून आले की, नियमित वॉक केल्याने वजन कमी होते, शिवाय अनेक गंभीर आजारांचा धोकाही टळतो (Fitness). पण वजन कमी करण्यासाठी नेमकं वॉक कधी करावे? चालल्याने खरंच वजन कमी होते का? वॉक करण्याची योग्य वेळ कोणती?(The Best Time of Day to Walk and Exercise).
वजन कमी करण्यासाठी कधी चालायचे?
जर्नल ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 'वजन कमी करण्यासाठी चालणे हा अतिशय प्रभावी व्यायाम मानला जातो. वजन कमी करण्यासाठी चालण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? हे अनेकांना ठाऊक नसते. जर आपण वेट लॉससाठी वॉक करत असाल तर, सकाळी ७ ते ९ वाजताच्या दरम्यान वॉक करू शकता. पण जर आपल्याला कामाच्या व्यापामुळे सकाळच्या वेळेस वॉक करायला जमत नसेल तर, सायंकाळी चाला. यामुळेही फरक दिसून येईल. शिवाय डिनरनंतरही आपण शतपावली करायला जाऊ शकता.'
घाईघाईत बकाबका ५ मिनिटांत जेवता? संशोधन सांगते, वजन वाढण्यापासून पित्ताच्या त्रासाचं महत्त्वाचं कारण
कॅलरीजकडे लक्ष ठेवा
आपण जितके कॅलरीज इनटेक करतो, त्या दुप्पटीने कॅलरीज बर्न होणं गरजेचं आहे. यामुळे वजन कमी करणं सोपे होते. अनेक जण कॅलरीज बर्न करण्याच्या काळात उलट-सुलट पदार्थ खातात. पण यामुळे कॅलरीज कमी होण्याऐवजी वाढू शकतात. त्यामुळे कमी कॅलरीजयुक्त पदार्थ खा. शिवाय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात करा.
सकाळी चालण्याचे फायदे
- नियमित चालल्याने वजन कमी करण्यास होते मदत.
- रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पायऱ्या जा चढत- वजन घटेल झरझर; पण वजन कमी करण्यासाठी किती मिनिटे पायऱ्यांचा व्यायाम करावा?
- मधुमेहग्रस्त रुग्णांना याचा दुहेरी फायदा होतो. चालण्याने त्यांचे वजनही कमी होते आणि साखरेची पातळीही नियंत्रित राहते.
- पचनसंस्थेच्या कार्यात मदत होते.
- तणाव कमी होते आणि झोपेशी संबंधित समस्या कमी होते.