Join us  

रोज सकाळी चालता तरी सुटलेलं पोट कणभरही कमी होत नाही?? वॉकिंगची 'योग्य वेळ' पाहा, पटकन बारीक व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 4:44 PM

The Best Time To walk For Weight Loss : वॉक केल्याने मांसपेशी आणि सांधे मजबूत होतात. ताण-तणाव एंग्जायटी कमी  होऊन ब्रेन फंक्शन सुधारण्यासही मदत होते.

वॉक केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात इतकंच नाही तर गंभीर आजाराचा धोकाही कमी होतो. (Weight Loss Tips) वॉक करणं हा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. (The Best Time To walk For Weight Loss) डॉक्टरांच्यामते रोज कमीत कमी ८ ते १० पाऊल  चालल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते असं केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. (Quick Weight Loss) वॉक केल्याने कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वॉकिंग उत्तम मानले जाते. (Best Time For Walk For Weight Loss)

वॉक केल्याने मांसपेशी आणि सांधे मजबूत होतात. ताण-तणाव एंग्जायटी कमी  होऊन ब्रेन फंक्शन सुधारण्यासही मदत होते. याशिवाय अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास होतात. (How Much to Walk To Lose Weight)  अनेकांना सकाळी वॉक करायला आवडतं तर काहीजण  संध्याकाळी वॉक करतात. वजन कमी करण्यासाठी कोणत्यावेळी वॉक करणं जास्त फायदेशीर ठरतं ते समजणं अवघड असते. (What is Best Time For Walk For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी सकाळी चालावं की संध्याकाळी (What is Good time for walk)

मेडिकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार  वजन कमी करण्यासाठी वॉकिंगचा बेस्ट टायमिंग माहित असायला हवा. हा खूपच सिंपल आणि प्रभावी व्यायाम आहे.  वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्यावेळी वॉक करू शकता हे माहीत असायला हवं. रोज सकाळी  ७ ते ९ च्या दरम्यानचा टायमिंग सगळ्यात उत्तम मानला जातो. सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी आणि रात्री वॉक करून तुम्ही सहज वजन कमी  करू शकता. 

चालल्यानंतरही वजन कमी का होत नाही?

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे कमीत कमी कॅलरीजचे सेवन करा.  ८ ते १० हजार  पाऊल चालल्यानंतर किंवा रोज १ तास वॉक केल्यानंतरही तुमचं वजन कमी होत नसेल याचा अर्थ तुमचा कॅलरी इन्टेक जास्त आहे. फक्त व्यायाम आणि वॉक करून तुम्ही वजन कमी करू शकत नाही.  बाकीच्या गोष्टींच्याकडेही लक्ष ठेवा.

१) रोज जवळपास २०० ते ३०० कॅलरीजचे सेवन कमी करा.

२) पोषक तत्वांनी परिपूर्ण अशा पदार्थांचा आहारात समावेश  करा.

३)  आहारात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि मायक्रोन्युट्रिएट्ंसस असावेत.

बदाम-पनीरपेक्षा दुप्पट प्रोटीन असलेले ५ पदार्थ खा; तिशीतही दिसाल तरुण आणि फ्रेश कायम

४) रात्री ७ ते ८ तासांची शांत  झोप घ्या.

५) साखर, मिठाई, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स,जंक फूड अशा पदार्थांचे सेवन कमी करा. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स