Lokmat Sakhi >Fitness > जेवण बंद केले, कमी खाल्ले तरी वजन वाढते! वेट लॉससाठी खाणे गरजेचे कारण..

जेवण बंद केले, कमी खाल्ले तरी वजन वाढते! वेट लॉससाठी खाणे गरजेचे कारण..

The Link Between Undereating and Weight Gain : वजन कमी करण्याच्या नादात जेवण स्किप करीत असाल तर, 'ही' चूक अजिबात करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 11:09 AM2024-06-16T11:09:53+5:302024-06-16T11:10:54+5:30

The Link Between Undereating and Weight Gain : वजन कमी करण्याच्या नादात जेवण स्किप करीत असाल तर, 'ही' चूक अजिबात करू नका

The Link Between Undereating and Weight Gain | जेवण बंद केले, कमी खाल्ले तरी वजन वाढते! वेट लॉससाठी खाणे गरजेचे कारण..

जेवण बंद केले, कमी खाल्ले तरी वजन वाढते! वेट लॉससाठी खाणे गरजेचे कारण..

वजन कमी करण्यासाठी बरेच लोक खाणं पिणं सोडून देतात (Weight Loss). काही जण चपाती, भात किंवा सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण स्किप करतात. असे केल्याने वजन कमी होऊ शकते (Undereating). असं काहींचा समज आहे. पण खरंच याने वजन कमी होऊ शकते का? जेवण स्किप केल्यानंतरही अनेकांचे वेट लॉस होत नाही (Weight Gain). जर तुमचंही वजन जेवण स्किप केल्यानंतर कमी होत नसेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा (Fitness).

जेवण स्किप न करता आपलं वजन कमी होऊ शकतं. आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी वजन कमी न होण्याचे काही टिप्स शेअर केले आहेत. ज्यामुळे वजन कमी करताना काही अडचणी निर्माण होतात. जेवण न सोडता आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, या टिप्स आपल्याला नक्कीच मदत करतील(The Link Between Undereating and Weight Gain).

जेवण सोडल्यानंतरही वजन का कमी होत नाही?

- वजन कमी करण्यासाठी लोक जेवण वगळतात. अनेक लोक रात्रीचं किंवा सकाळचा नाश्ता स्किप करतात. असं करू नका.

- तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा जेवण वगळणे योग्य नाही.

- निरोगी अन्न आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.

थुलथुलीत-सुटलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसते? ५ जबरदस्त उपाय - पोटाची चरबी होईल झरझर कमी

- जास्त वेळ उपाशी राहिल्याने आपल्या पचन आणि उर्जेवरही परिणाम होतो. त्यामुळे वेळोवेळी खाणं गरजेचं आहे.

- जेव्हा जेवण वगळण्यास आपण सुरुवात करतो, तेव्हा चयापचयक्रिया मंदावायला लागते.

- क्रॅश डाएट किंवा जेवण वगळल्याने वजन कमी होत नाही. वजन कमी झाले तरी ते फार काळ होत नाही. पुन्हा वाढू शकते.

- वेट लॉससाठी चयापचय बुस्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा आपली चयापचय मंदावते, तेव्हा शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया देखील मंदावते.

- जेवण वगळल्याने शरीर कमकुवत होते आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. त्यामुळे आजारांचाही धोका वाढतो.

वजन कमी करायचं तर महिनाभर रात्री 'या' वेळेत जेवा; सुटलेलं पोट होईल सपाट, वजन कमी

- वजन कमी करायचे असेल तर सकस आहार घ्या. रात्रीचे हलके जेवण करा पण ते वगळू नका.

- वजन कमी करण्यासाठी प्रथिने, फायबर आणि कर्बोदकांचे निरोगी पदार्थांचा आहारात समावेश करा.

- वजन कमी करण्यासाठी, निरोगी आहार आणि योग्य दिनचर्या पाळणे फार महत्वाचे आहे.

Web Title: The Link Between Undereating and Weight Gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.