Lokmat Sakhi >Fitness > व्यायाम केला तर चेहऱ्यावर चकचकीत ग्लो येतो हे खरं की खोटं ? तज्ज्ञ सांगतात...

व्यायाम केला तर चेहऱ्यावर चकचकीत ग्लो येतो हे खरं की खोटं ? तज्ज्ञ सांगतात...

The beauty benefits of exercise : व्यायाम करा चेहऱ्यावर ग्लो येईल असं अनेकजण सांगतात, पण तसं खरंच होतं का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 07:56 AM2023-09-21T07:56:58+5:302023-09-21T08:15:18+5:30

The beauty benefits of exercise : व्यायाम करा चेहऱ्यावर ग्लो येईल असं अनेकजण सांगतात, पण तसं खरंच होतं का ?

The Scientific Reasons That Exercise Can Give You Better-Looking Skin. | व्यायाम केला तर चेहऱ्यावर चकचकीत ग्लो येतो हे खरं की खोटं ? तज्ज्ञ सांगतात...

व्यायाम केला तर चेहऱ्यावर चकचकीत ग्लो येतो हे खरं की खोटं ? तज्ज्ञ सांगतात...

एक्सरसाइज करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असते. एक्सरसाइज केल्यामुळे आपले शरीर, मन हे आतून तंदुरुस्त राहण्यास मदत होते.  नियमित व्यायाम केल्याने शारीरिक हालचालींमध्ये तंदुरुस्ती राहते, हृदय व रक्तवाहिन्याचे आरोग्य वाढते, शारीरिक ऊर्जा वाढते आणि शरीराचे वजन निरोगी राहण्यास मदत होते. आपण नियमित व्यायाम केल्याने सकारात्मक होतो, चांगल्या कार्याला प्रोत्साहन मिळते. नियमित व्यायमाचे फायदे  स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी, लवचिकता, मानसिक आरोग्य आणि मानसिक संतुलन वाढवण्यासाठी आणि एकूण शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक्सरसाइज हा उत्कृष्ट असा एक मार्ग आहे(Skin health and working out–is there a connection?).

 एक्सरसाइज करून आपले वाढलेले वजन कमी होऊ शकते. यासोबतच शरीर टोन्ड होण्यास देखील मदत होते. मानसिक आरोग्यालाही चालना मिळते, म्हणजेच एकूणच एक्सरसाइज केल्याने आरोग्याला फायदा होतो. परंतु एक्सरसाइज केल्याने आपल्या त्वचेला एक प्रकारची चमक प्राप्त होते (The Scientific Reasons That Exercise Can Give You Better-Looking Skin) हे आपण आजपर्यंत ऐकलेच असेल. परंतु खरंच असे होते का ? एक्सरसाइज (Does working out and sweating makes the skin fairer and cleaner?) केल्याने वजन तर नक्कीच कमी होते, पण त्याचबरोबर त्वचेला देखील याचा फायदा होतो. आपल्या त्वचेला सुंदर ग्लो यावा किंवा आपल्या चेहऱ्यावरील चमक कायम राहावी, असे प्रत्येकीला वाटत असते. यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्स व महागड्या पार्लरच्या ट्रिटमेंट्स करून घेतो. परंतु चेहऱ्यावरील ग्लो कायम ठेवण्यासाठी क्रिम्स व महागड्या पार्लरच्या ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा आपण एक्सरसाइज (Do exercises make skin glow? If yes, how?) करुन चेहऱ्यावरील ग्लो कायम ठेवू शकतो. याबाबत चीफ डर्मेटोलॉजिस्ट डॉ. मोनिका चहर यांनी अधिक माहिती दिली आहे(Does Exercise Increase Skin Glow ?).

एक्सरसाइज केल्याने चेहऱ्यावर कायमचा ग्लो कसा टिकून राहतो ?  

१. रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते :- जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपले रक्ताभिसरण सुधारते. दररोज एक्सरसाइज केल्याने आपले हृदय त्वचेच्या पेशींना ऑक्सिजन आणि महत्वाची पोषक द्रव्ये पोहोचवण्यासाठी रक्त पंप करण्यात अधिक कार्यक्षम बनते. हे वाढलेले रक्ताभिसरण केवळ तुमच्या त्वचेला निरोगी स्वरूप देत नाही तर आपल्या शरीरातील विषारी पदार्थही काढून टाकते. यामुळे आपल्या चेहेऱ्यावर कायमचा ग्लो वाढण्यास देखील फार मदत होते. 

पोट आणि कंबरेचा घेर कमीच होत नाही ? रोज १० मिनिटे करा ६ गोष्टी...

२. त्वचा डिटॉक्सिफाइड होते :- तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण एक्सरसाइज करता तेव्हा आपल्या त्वचेला आणि शरीराला घाम येतो. घाम येणे हे नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग प्रक्रियेचे मुख्य कार्य करते. आपल्याला घाम आल्यानंतर त्वचेच्या पृष्ठभागावरील अशुद्धता आणि अतिरिक्त तेल हे आपोआप बाहेर काढून शरीराबाहेर फेकले जाते. त्वचेला पुरेसा घाम आलुयामुळे त्वचेची छिद्र उघडी होऊन मोकळी होतात. त्यामुळे या छिद्रात साचलेली घाण बाहेर पडते. घामामुळे त्वचेवर पडणारे कोणतेही डाग दूर करण्यासाठी व्यायामानंतर आपला चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. 

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

३. ताण कमी करते :- एक्सरसाइजद्वारे तणावाची पातळी कमी केल्याने कॉर्टिसोल सारख्या तणावाच्या संप्रेरकांचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे चेहेऱ्यावरील  अतिरिक्त मुरुम आणि तेल स्राव कमी होतो. परिणामी ताण कमी झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो व तेज कायम त्वचेवर टिकून राहण्यास मदत होते. 

वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

४. कोलोजेन उत्पादन वाढवते :- व्यायामामुळे कोलोजेन निर्मितीला चालना मिळते. त्वचेची लवचिकता आणि कणखरता राखणे. कोलोजेनच्या उत्पादनामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. परिणामी, त्वचा अधिक तरूण व चमकदार दिसते.

हनुवटीवरची चरबी खूप वाढल्यानं जॉ लाइन दिसतच नाही ? परफेक्ट जॉ लाइन मिळवण्यासाठी ८ सोपे उपाय...

५. पुरेशी झोप घ्या व झोपेच्या वेळा पाळा :- जर आपल्याला आपली त्वचा कायम यंग, ग्लोइंग व तजेलदार हवी असेल अंतर पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. पुरेशी झोप घेण्यासोबतच झोपेच्या वेळा पाळणे हे देखील तितकेच महत्वाचे असते. नियमित व्यायामामुळे आपल्या झोपेची गुणवत्ता आणि कालावधी दोन्ही वाढू शकतात, जे आपण रात्री झोपल्यानंतर त्वचा दुरुस्त करण्यात मदत करू शकतात.

६. योग्य हायड्रेशन :- आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि चमकदारपणासाठी योग्य हायड्रेशन राखणे आवश्यक आहे. जेव्हा आपण रोज एक्सरसाइज करतो तेव्हा आपले पाणी पिण्याचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढते ज्यामुळे त्वचेचा ओलावा आणि कोमलता टिकून राहते.

Web Title: The Scientific Reasons That Exercise Can Give You Better-Looking Skin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.