Lokmat Sakhi >Fitness > अस्ताव्यस्त सुटलेलं बेढब पोट उपाशी राहून पोट कमी होणार नाही, चरबी घटवण्यासाठी खा ४ पदार्थ

अस्ताव्यस्त सुटलेलं बेढब पोट उपाशी राहून पोट कमी होणार नाही, चरबी घटवण्यासाठी खा ४ पदार्थ

The Top 4 Foods to Lose Belly Fat : उपाशी न राहता करा पोट कमी, पाहा ४ टेस्टी-हेल्दी पदार्थांची यादी, पोट कमी करण्यासाठी बेस्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2023 02:39 PM2023-12-01T14:39:53+5:302023-12-01T14:40:47+5:30

The Top 4 Foods to Lose Belly Fat : उपाशी न राहता करा पोट कमी, पाहा ४ टेस्टी-हेल्दी पदार्थांची यादी, पोट कमी करण्यासाठी बेस्ट..

The Top 4 Foods to Lose Belly Fat | अस्ताव्यस्त सुटलेलं बेढब पोट उपाशी राहून पोट कमी होणार नाही, चरबी घटवण्यासाठी खा ४ पदार्थ

अस्ताव्यस्त सुटलेलं बेढब पोट उपाशी राहून पोट कमी होणार नाही, चरबी घटवण्यासाठी खा ४ पदार्थ

वजन कमी करणं (Weight Loss) हे कोणत्याही टास्कपेक्षा कमी नाही. पण अनेकदा हात-पाय कमी पण सुटलेल्या पोटाची चरबी वाढत जाते. पोटाच्या वाढत्या चरबीमुळे कपडे फिट बसतात, शिवाय शरीर बेढप दिसते. पोटाची चरबी (Belly Fat) घटवण्यासाठी बरेच जण स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात.

शिवाय एक्सरसाईजही करतात. पण याचा फरक पोट सोडून इतर अवयांवर दिसून येतो. सुटलेल्या पोटाची चरबी एक्सरसाईज करून कमी होत नसेल तर, डाएटमध्ये (Diet Food) ४ पदार्थांचा नक्कीच समावेश करा. उपाशी राहून, अतिरिक्त एक्सरसाईज (Fitness) करून, हे सगळे फंडे फेल झाले असतील तर, आता खाऊन पोटाची चरबी घटवा(The Top 4 Foods to Lose Belly Fat).

पोटातील हट्टी चरबी कमी करण्यासाठी खा ४ पदार्थ

दही

दह्याचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, वजन कमी करण्यासाठीही होऊ शकतो. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. नॅशनल इन्सिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार, दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल्स, विटामिन्स आढळतात. शिवाय दह्यात गुड बॅक्टेरियाही असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय वजनही कमी होते. आपण दह्याचा वापर पदार्थांमध्ये किंवा ताक पिऊन पोट कमी करू शकता.

पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो? बद्धकोष्ठतेवर घरगुती ५ उपाय, पोट होईल साफ-सकाळी एकदम ओके

ग्रीन टी

अनेकांची दिवसाची सुरुवात चहानेच होते. पण चहामुळे बरेच आरोग्याच्या निगडीत नुकसानही घडतात. जर आपण देखील दिवसाची सुरुवात दूध-साखरेच्या चहाने करत असाल तर, वेळीच थांबा. त्याऐवजी आपण ग्रीन टी पिऊन दिवसाची सुरुवात करू शकता. ग्रीन टी मध्ये कॅफिन आणि कॅटेचिन नावाचे फ्लेव्होनॉइड्स असते. या दोन्ही कंपाउंडमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

हिरव्या पालेभाज्या

आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असायलाच हवा. पालक, मेथी, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. शिवाय त्यात  फायबरचे प्रमाण जास्त व कॅलरीजचे प्रमाण कमी असते. फायबरमुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

डाळ शिजताना त्यावर फेस तयार होतो? आरोग्यासाठी चांगला की वाईट? ठेवावा की फेकून द्यावा?

धान्य

उत्तम आरोग्यासाठी आहारात विविध धान्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. गहू, ज्वारी, ब्राऊन राईस, क्विनोवा, यासह फायबरयुक्त धान्यांचा आहारात समावेश करा. या धान्यांमुळे पोट भरलेले राहते, शिवाय पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.

Web Title: The Top 4 Foods to Lose Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.