Lokmat Sakhi >Fitness > वजन करताना ५ चुका टाळा, नाहीतर चुकेल वजन काटा ! कधी कराल वजन...

वजन करताना ५ चुका टाळा, नाहीतर चुकेल वजन काटा ! कधी कराल वजन...

Do not make these 5 mistakes while checking weight : आपण कोणत्या वेळी वजन तपासत आहात, वजन तपासण्याचा योग्य मार्ग अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा परिणाम वजनावर होतो. अशा परिस्थितीत योग्य वजन जाणून घेण्यासाठी या ५ चुका टाळा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 09:10 AM2023-07-23T09:10:10+5:302023-07-24T16:27:52+5:30

Do not make these 5 mistakes while checking weight : आपण कोणत्या वेळी वजन तपासत आहात, वजन तपासण्याचा योग्य मार्ग अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा परिणाम वजनावर होतो. अशा परिस्थितीत योग्य वजन जाणून घेण्यासाठी या ५ चुका टाळा....

The Top 5 Weight Measuring Mistakes to Avoid. | वजन करताना ५ चुका टाळा, नाहीतर चुकेल वजन काटा ! कधी कराल वजन...

वजन करताना ५ चुका टाळा, नाहीतर चुकेल वजन काटा ! कधी कराल वजन...

आजकाल सगळेच आपल्या वजनाच्या बाबतीत खूपच काळजी करताना दिसतात. काहीजण आपले वजन आठवड्यातून एक दोन वेळा तरी तपासून पाहतात. खरंतर आठवड्याला वजन तपासून पाहून त्याचा रेकॉर्ड ठेवणे ही एक चांगली सवय आहे. नियमित वजन तपासण्यानेही वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आपण दर आठवड्याला जरी वजन तपासून पाहत असलो तरी काहीवेळा आपल्याला वजनात थोडा फरक हा जाणवतोच. कधी आपले वजन १ - २ किलोंनी जास्त येते तर कधी कमी येते. असे झाल्यावर आपण लगेच आपल्या डाएट आणि एक्सरसाइज रुटीनमध्ये बदल करतो. परंतु हे अतिशय चुकीचे आहे. 

जर आपण देखील दर आठवड्याला वजन तपासून पाहण्याऱ्यांपैकी एक असाल, तर आपल्याला वजन तपासून पाहताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. काहीवेळा आठवड्याला वजन तपासून पाहताना आपल्याला वजनात अधिकच फरक झालेला दिसून येतो. वजन काट्यावर वजन कधी कमी तर कधी जास्त दिसून येते. वजन तपासून पाहताना आपल्या हातून काही चुका होतात, यामुळेच आपल्याला वजनात फरक जाणवतो. आहारतज्ज्ञ राधिका गोयल सांगत आहेत वजन तपासण्याचा योग्य मार्ग. यासोबतच कोणत्या दिवशी वजन तपासणी टाळावी, वजन तपासताना कोणत्या चुका टाळाव्यात याविषयी अधिक माहिती दिली आहे(Do not make these 5 mistakes while checking weight).

वजन तपासताना नेमक्या होणाऱ्या चुका कोणत्या ?

 चूक १ :- मासिक पाळीपूर्वी वजन तपासू नका.    

मासिक पाळीच्या दरम्यान किंवा त्यापूर्वीही वजन तपासू नये. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे या काळात महिलांचे वजन वाढू किंवा कमी होऊ शकते. मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना ब्लोटिंग किंवा इतर काही समस्या देखील जाणवू शकतात. यामुळे मासिक पाळीपूर्वी किंवा मासिक पाळी सुरु असताना वजन तपासून पाहू नये. 

चूक २ :- व्यायाम केल्यानंतर लगेचच वजन तपासून पाहू नका. 

व्यायामानंतर लगेचच आपले वजन तपासले, आणि अशावेळी आपले वजन कमी येते. हे कमी झालेले वजन पाहून आपल्याला कदाचित आनंद होईल. परंतु हे तुमचे खरे वजन नाही. वर्कआउट केल्यानंतर शरीरातून भरपूर घाम येतो. अशा परिस्थितीत वजन कमी होऊ शकते पण ते तुमचे खरे वजन नसते. यामुळे व्यायाम केल्यानंतर लगेचच वजन तपासून पाहू नका. 

सकाळी उठल्या उठल्या करा ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी-तब्येत एकदम फिट...

चूक ३ :- पोट साफ नसेल तर वजन तपासू नका. 

जर आपले पोट साफ नसेल, किंवा जर आपल्याला बद्धकोष्ठता असेल तर या काळातही वजन तपासू नये. जर आपण यावेळी वजन तपासून पाहिले तर येणारे वजन हे तुमच्या वास्तविक वजनापेक्षा जास्तच असेल आणि यामुळे तुम्ही तुमच्या वास्तविक वजनाचा अंदाज लावू शकणार नाही. 

पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी...


  
चूक ४ :- पुरेशी झोप न मिळाल्यास वजन तपासू नका. 

जर आपली झोप पूर्ण होत नसली तरीही तुम्ही तुमचे वजन तपासून पाहू नये. झोपेच्या कमतरतेमुळे पचनाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात . याव्यतिरिक्त, याचा ताण हार्मोन्सवर देखील परिणाम करतो. यामुळे तुमचे योग्य वजन यावेळी येणार नाही. यासाठीच पुरेशी झोप न मिळाल्यास वजन तपासू नका. 

पावसाळ्यात मॉर्निंग वॉकला जाता येतं नाही? ६ सोपे उपाय, घरातच राहून वजन होईल कमी...

चूक ५ :- हेव्ही जेवणानंतर वजन तपासू नका. 

जर तुम्ही हेल्दी डाएट घेत असाल पण वीकेंडला जर आपण हेव्ही जेवण घेतले असेल किंवा जर आपला चिट डे असेल तर त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी वजन तपासू नका. ते वाढलेलेच येईल. चीट डे नंतर काही सोप्या टिप्स फॉलो करा जेणेकरून त्याचा तुमच्या वजनावर जास्त परिणाम होणार नाही.

Web Title: The Top 5 Weight Measuring Mistakes to Avoid.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.