Join us

झोपेशी संबंधित ५ खास सवयी स्वत:ला लावा, १०० वर्ष जगण्याची इच्छा होईल पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:51 IST

Sleep Habits : प्रसिद्ध न्यूरो सायंटिस्ट डॉ. कॅरोलिन लीफ यांच्यानुसार, झोप शरीर आणि मेंदुला पुन्हा ऊर्जा देण्याचं काम करते. ज्यामुळे तुमचं निरोगी राहता आणि आयुष्यही वाढतं.

Sleep Habits : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी रोज पुरेशी आणि चांगली झोप घेणं खूप महत्वाचं मानलं जातं. पण बऱ्याच लोकांना पुरेशी आणि चांगली झोप मिळत नाही. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो. झोप केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्य आणि दीर्घायुष्यात महत्वाची भूमिका बजावते.

प्रसिद्ध न्यूरो सायंटिस्ट डॉ. कॅरोलिन लीफ यांच्यानुसार, झोप शरीर आणि मेंदुला पुन्हा ऊर्जा देण्याचं काम करते. ज्यामुळे तुमचं निरोगी राहता आणि आयुष्यही वाढतं. पण झोपेची क्वालिटी सुधारण्यासाठी योग्य सवयी आणि पद्धत फॉलो कराव्या लागतील. त्याच आम्ही सांगणार आहोत.

मानसिकतेत करा बदल

झोपेतून उठल्यानंतरचे काही क्षण दिवसाची सुरूवात करण्यास फार गरजेचं आहे. जागे झाल्यानंतर ३० सेकंदाच्या आत आपल्या मानसिकतेत बदल करण्याचा प्रयत्न करा. यानं मानसिक शांतात आणि सकारात्मकता आणण्यास मदत मिळते. तुम्ही या दिवसाच्या कामांचं चांगलं प्लॅनिंग करू शकता.

ताजी हवा आणि सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या

दिवसाची सुरूवात फ्रेश करण्यासाठी ताजी हवा आणि सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या. असं केल्यास तुमची सर्केडियन रिदम सेट होते, ज्यामुळे तुमची झोपेची क्वालिटी सुधारते. तसेच तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं.

सकारात्मक विचार

दिवसाची सुरूवात करताना विचार सकारात्मक ठेवा. सगळ्यात आधी तुमच्या नकारात्मक विचारांना ओळखा आणि स्वत:ला विचार की, तुम्ही आजचा दिवस चांगल्या पद्धतीनं पार करू शकता का? या प्रश्नानं तुम्हाला मानसिक शांतता आणि समाधान मिळेल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर चांगलं काम करू शकाल.

झोपण्याआधी हलकं जेवण

रात्री झोपण्याआधी उपाशी राहू नये. जेवणाची वेळ झोपण्याच्या काही तास आधी असावी. जेणेकरून पचन व्यवस्थित व्हावं. तरीही भूक लागली तर हलकं आणि झोपेत अडथळा निर्माण न करणारं जेवण करा. सोबतच दारू आणि कॅफीन पिणं टाळा. कारण यानं झोपेचं खोबरं होतं.

झोपेचं रूटीन ठरवा

चांगल्या झोपेसाठी गरजेचं की, झोपेआधी आरामदायक रूटीन फॉलो करा. स्क्रीन टाइम कमी करा आणि झोपण्याआधी शांतता देणाऱ्या अ‍ॅक्टिविटी जसे की, पुस्तक वाचा किंवा हलकं स्ट्रेचिंग करा. यानं शरीर आणि मेंदू शांत होतो व तुम्हाला चांगली झोप लागते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स