Lokmat Sakhi >Fitness > रोज सकाळी नकळत ५ चुका होतात आणि वजन वाढायला लागते, पाहा नेमके काय चुकते?

रोज सकाळी नकळत ५ चुका होतात आणि वजन वाढायला लागते, पाहा नेमके काय चुकते?

These 5 morning habits may be causing you to gain weight : दिवसभर फ्रेश आणि आनंदी वाटायला हवे तर काही सवयीत लहान बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2023 03:50 PM2023-09-22T15:50:44+5:302023-09-22T15:52:36+5:30

These 5 morning habits may be causing you to gain weight : दिवसभर फ्रेश आणि आनंदी वाटायला हवे तर काही सवयीत लहान बदल करा

These 5 morning habits may be causing you to gain weight | रोज सकाळी नकळत ५ चुका होतात आणि वजन वाढायला लागते, पाहा नेमके काय चुकते?

रोज सकाळी नकळत ५ चुका होतात आणि वजन वाढायला लागते, पाहा नेमके काय चुकते?

सकाळची सुरुवात चांगली आणि हेल्दी व्हावी यासाठी सगळेच प्रयत्न करतात. पण घाईबडीमुळे सकाळचा नाश्ता किंवा व्यायाम स्किप होतो. उशिरा उठणे, ब्रेकफास्ट स्किप करणे, सकाळी पाणी न पिणे, व्यायाम न करणे यांसारख्या लहान - सहान गोष्टी शुल्लक जरी वाटत असल्या तरी, यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय आरोग्याला देखील हानी पोहचते.

मुख्य म्हणजे या चुकांमुळे संपूर्ण दिवस हा आळसात आणि थकव्यात जातो. ज्यामुळे प्रॉडक्टिविटी कमी होते. सकाळी कोणत्या चुका टाळायला हव्या, कोणत्या गोष्टी करायला हव्या, कोणती गोष्ट टाळल्याने आरोग्याला फायदा होतो? ५ चुकांमुळे वजन वाढते का? कोणत्या आहेत त्या ५ चुका पाहूयात(These 5 morning habits may be causing you to gain weight).

उशिरा उठणे

सकाळी उशिरा उठण्याची सवय अनेकांना असते. खरंतर दिवसाची सुरुवात ही लवकर उठून करायला हवी. सकाळी उशिरा उठल्याने इतर कामे रखडली जातात. ज्यामुळे आपण इतर गोष्टी घाईघाईत करतो. जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. सकाळी लवकर उठून नाश्ता करायला हवा. नाश्ता केल्याने आरोग्य उत्तम राहते. जास्त वेळ झोपल्याने किंवा नाश्ता स्किप केल्याने भरभर वजन वाढत जाते.

खूप खा खा झाली तर टेन्शन विसरा, ५ सोपे उपाय - काही दिवसात वजनाचा काटा उतरलेला दिसेल

सकाळी उठून पाणी न पिणे

सकाळी सर्वात आधी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हणतात की सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय पचनक्रिया सुधारते. ज्यांमुळे चयापचय बुस्ट होते, व वजन कमी होण्यास मदत होते. म्हणून दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करा आणि दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी प्या.

अनहेल्दी फुड्स खाणे, हेल्दी ब्रेकफास्ट स्किप करणे

जर आपण दिवसाची सुरुवात पिझ्झा, बर्गर, फ्राईड फुड्स खाऊन करत असाल तर निश्चितच आपलं वजन वाढेल. अनहेल्दी फुड्स आरोग्यासाठी हानिकारक ठरते. काही लोकं वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता स्किप करतात. परंतु, याने वजन कमी होत नाही, उलट झपाट्याने वाढते. त्यामुळे सकाळचा नाश्ता आरोग्यदायी असावा.

सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर

जेवताना टीव्ही किंवा मोबाईल फोन पाहणे

अनेकांना जेवताना टीव्ही किंवा मोबाईल फोन पाहण्याची सवय असते. मात्र, या सवयीमुळे आपण किती प्रमाणात खात आहोत याची कल्पना आपल्याला नसते. यामुळे अनेक वेळा अतिप्रमाणात अन्न खाल्ल्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते.

सकाळी व्यायाम न करणे

उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार व व्यायाम महत्वाचा आहे. जर आपण सकाळी व्यायाम करत नसाल तर, आजपासून करायला सुरुवात करा. नियमित ४५ मिनिटे व्यायाम करा. यामुळे आपण तंदुरुस्त राहाल, व वजन देखील झपाट्याने वाढणार नाही.

Web Title: These 5 morning habits may be causing you to gain weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.