Join us

तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2024 15:32 IST

These are the best oils to use for weight loss : 'या' ४ प्रकारच्या तेलामुळे वजन वाढत नाही; बॅड कोलेस्टेरॉलही कमी होतं..

वेट - फॅट ल़ॉस करताना काय खावे यापेक्षा काय खाऊ नये हे जाणून घेणं गरजेचं आहे (Cooking Oil). वेट लॉसदरम्यान, आपण अनहेल्दी पदार्थ वगळून हेल्दी पदार्थ खाण्यावर भर देतो (Weight Loss). फ्राईड पदार्थ खाणं बंद करतो. पण आहारात तेलाचा समावेश होतोच. हेल्दी पदार्थ खाऊनही बऱ्याचदा वजन कमी होत नाही (Fitness). याला कारणीभूत आपण वापरात असलेले तेल.

विविध पदार्थांमध्ये चमचाभर का असेना आपण तेलाचा वापर करतो. जर आपण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर, रोजच्या वापरासाठी या ४ प्रकारच्या कुकिंग ऑईलचा समावेश करून पाहा. यामुळे शरीराला अनेक पौष्टीक घटक मिळतीलच, यासह लठ्ठपणा, बॅड कोलेस्टेरॉल, मधुमेह यासह गंभीर आजारांचा धोका कमी होईल(These are the best oils to use for weight loss).

वेट लॉससाठी कोणत्या तेलाचा समावेश करावा?

ऑलिव्ह ऑइल

एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 'ऑलिव्ह ऑइलमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फॅटी ऍसिडस् यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो. यात लठ्ठपणा कमी करणारेही गुणधर्म असतात. यासाठी आपण आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करू शकता. या तेलामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदा होईल.

कपभर रवा आणि पाणी; पाहा कुरकुरीत मेदूवड्याची इन्स्टंट रेसिपी; अगदी १० मिनिटात नाश्ता रेडी

मोहरीचे तेल

रिसर्चगेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मोहरीच्या तेलामध्ये असलेले पोषक घटक वेट लॉससाठी मदत करते. या तेलामध्ये बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे जसे की रिबोफ्लेविन आणि नियासिन असतात. हे शरीराला अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते. तसेच, या तेलामध्ये डायसिलग्लिसेरॉल देखील असते, जे वजन कमी करण्यास मदत करू शकते.

खोबरेल तेल

त्वचा, केस आणि एकूणच आरोग्यासाठी खोबरेल तेल नेहमीच फायदेशीर मानले जाते. त्यात असलेले मिडीयम चेन फॅटी अॅसिड, जसे की लॉरिक अॅसिड, कॅप्रिलिक अॅसिड आणि कॅप्रिलिक अॅसिड शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी काढून टाकण्याचे काम करतात.

वजन कमी करण्याचे सगळेच फंडे फेल? 'या' चहामध्ये तूप घालून प्या; थुलथुलीत पोट होईल सपाट आणि..

एवोकॅडो तेल

एवोकॅडो तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि ओलिक फॅटी अॅसिड असतात. जे पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी असतात. मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका देखील त्याच्या सेवनाने कमी केला जाऊ शकतो.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स