Join us  

गव्हाच्या पिठांत मिसळा ३ प्रकारची पिठं, वजन होईल झरझर कमी- खा चपाती बिंधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 9:13 PM

These flour options can turn your regular roti into a weight-loss friendly food : वजन कमी करायचं की गहू बंद असं करायचंही काही कारण नाही.

मेन कोर्समध्ये आपण चपाती किंवा भाकरी खातोच. चपाती आणि भाकरीशिवाय भारतीय थाळी अपूर्ण आहे. मात्र, वेट लॉस करण्याच्या नादात आपण चपाती खाणं बंद करतो. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, चपाती खाल्ल्याने वजन वाढते. चपाती ही खरंतर गव्हाच्या पिठाचा वापर करून तयार होते. त्यामुळे मधुमेहग्रस्त रुग्ण आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे, ते लोकं चपाती खाणं टाळतात. जर आपण वेट लॉस करत असाल तर, आहारात ३ पिठांचा समावेश करा.

या ३ प्रकारच्या पिठांमुळे वजन कमी करण्यास मदत होईल. कारण यात फायबर आणि इतर काही पोषक तत्वे आढळतात. जे पचन सुधारण्यास व वजन कमी करण्यास मदत करतात. वेट लॉस करताना कोणत्या ३ पिठांचा आहारात समावेश करावा याची माहिती आहारतज्ज्ञ सिमरन कौर यांनी दिली आहे(These flour options can turn your regular roti into a weight-loss friendly food).

ज्वारीचे पीठ

वजन कमी करण्यासाठी ज्वारीचे पीठ फायदेशीर ठरते. ज्वारीच्या पिठात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह यासह अनेक जीवनसत्त्वे असतात. जे पचनासाठी उत्तम मानले जाते. याशिवाय रक्तातील साखर नियंत्रित राहते. ज्वारीच्या पिठात गव्हाचे पीठ मिसळून आपण चपात्या तयार करू शकता.

रात्री झोपण्यापूर्वी ४ चुका करता म्हणून तुमचे वजन वाढते, फक्त ४ गोष्टी बदला व्हा स्लिम

चण्याचं पीठ

वजन कमी करण्यासाठी बरेच जण बेसनाचा आहारात समावेश करतात. त्यात झिंक, फोलेट आणि लोह असते. याशिवाय प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते. त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

झोप कमी झाली की वजन वाढतं हे खरं की खोटं? वजन वाढत असेल तर झोपा काढा..

शिंगाड्याचे पीठ

आपण गव्हाच्या पिठात शिंगाड्याचे पीठ मिसळून चपात्या करू शकता. शिंगाड्याचे पीठ ग्लुटेन फ्री असते. यात कार्बोहायड्रेट, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासह शरीराला पोषण तत्वांचाही पुरवठा होतो. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सअन्न