Join us  

मांड्या खूप जाड झाल्या? ३ सोपे व्यायाम, मांड्यांवरचे फॅट्स होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 7:09 PM

Thighs too thick? 3 simple exercises, fat on thighs will be reduced सुटलेलं पोट आणि जाडजूड मांड्या यामुळे शरीर बेढब दिसतं? करा ३ सोपे व्यायाम

वाढलेलं वजन कमी करणे सोपे काम नाही, पण अशक्य असे देखील नाही. वजन कमी करण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहे. एक म्हणजे आहार आणि दुसरे म्हणजे व्यायाम. या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे पाळल्या की, वजन कमी होईल. वाढलेलं वजन कमी करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. पोट सुटणं आणि मांड्या जाडजूड होणं ही समस्या अनेकींना छळते. मांड्या थुलथुलीत होतात. चालताना घासतात आणि त्वचेवर इजा होते व मांड्या काळपट पडतात. मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी योग्य आहारासह ३ व्यायाम नियमित करा.

पायऱ्या चढा उतरा

पायऱ्या चढणे हा एक प्रकारचा व्यायामच आहे. ज्यामुळे मांड्यांवरची चरबी लवकर कमी होण्यास मदत मिळते. दररोज किमान ५ वेळा पायऱ्यांवरून चढ - उतार करा. हा व्यायाम नियमित केल्याने मांड्यांवरची चरबी झरझर कमी होईल.

उठाबशा काढा

उठाबशा हा शिक्षेचा प्रकार नसून खरंतर व्यायामच म्हणावं लागेल.या व्यायामामुळे मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. चरबीही कमी होते. मांड्यांसह पोटाची आणि हिपची चरबी कमी करण्यास मदत मिळते. आपण दिवसातून २० वेळा सिट-अप हा व्यायाम करू शकता.

सायकलिंग

अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सायकल चालवण्याचा सल्ला आपल्याला अनेकांनी दिला असेल. सायकल चालवल्याने पायांना मजबुती मिळते.

जास्त पाणी प्या

वजन कमी करत असताना जास्तीत जास्त पाणी प्या. योग्य आहार घ्या.

टॅग्स :व्यायामफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य