Lokmat Sakhi >Fitness > सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

Soak these 3 ingredients overnight and drink in morning to detox your body : डिटॉक्सचं काम शरीर चोवीस तास करत असतं, मात्र पिण्याच्या पाण्यात काही गोष्टी घातल्या तर हे काम अधिक सोपं होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2023 09:20 AM2023-06-20T09:20:00+5:302023-06-20T09:20:01+5:30

Soak these 3 ingredients overnight and drink in morning to detox your body : डिटॉक्सचं काम शरीर चोवीस तास करत असतं, मात्र पिण्याच्या पाण्यात काही गोष्टी घातल्या तर हे काम अधिक सोपं होईल.

This 3-ingredient drink can help detox and lose weight quickly | सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

आपण सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय खातो किंवा पितो यावर शरीराचा फिटनेस अवलंबून असतो. आपली सध्याची जीवनशैली ही खूप बिझी व फास्ट झालेली आहे. रोजची धावपळ, धकाधकीचे जीवन, व्यायामाचा अभाव, सतत बाहेरचे जंक फूड खाणे यांसारख्या वाईट सवयींमुळे आपल्याला काही शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. रोजच्या या कामकाजातून वेळ मिळत नाही. पण अतिरिक्त ऊर्जेची मात्र गरज असते. आपल्याला कधी थकायला होतं याचं भानही राहात नाही. त्यामुळे शरीरामध्ये अधिक टॉक्सिन जमा होण्याचीही शक्यता असते. याच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी नियमित स्वरुपात शरीराच्या डिटॉक्सची साफसफाई होणंही तितकंच गरजेचं आहे. यासाठी डिटॉक्स वॉटर आपल्या शरीराची स्वच्छता ठेवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतं. डिटॉक्स वॉटर हे नैसर्गिक स्वरूपात असून साधारणपणे जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी, पाचनशक्ती अधिक चांगली बनवण्यासाठी, लिव्हर साफ ठेवण्यासाठी आणि आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. 

डिटॉक्स वॉटरचं काम हे आपल्या शरीरातील डिटॉक्सची सफाई करण्याचं आहे. टॉक्सिक पदार्थ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. आपल्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या अथवा जागण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीरामध्ये बरेच टॉक्सिक पदार्थ तयार होत असतात. हे पदार्थ शरीराच्या बाहेर काढणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी आपल्या शरीरातील ही घाण साफ करण्यासाठी डिटॉक्स वॉटरचा फायदा होतो(This 3-ingredient drink can help detox and lose weight quickly).

डिटॉक्स वॉटर नेमके कसे बनवावे ? 

डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी, लिंबू यांच्या गोल चकत्या कापून घ्याव्यात. आता एका मोठ्या जारमध्ये पाणी घेऊन त्यात या काकडी, लिंबू यांच्या गोल कापलेल्या चकत्या घालाव्यात. त्यानंतर त्यात मूठभर पुदिन्याची पाने घालावीत. हे सर्व घटक पाण्यात रात्रभर भिजत ठेवावेत. सकाळी उठल्यानंतर  हे सर्व पदार्थ गाळून घेऊन फक्त पाणी बाजूला ओतून घेऊन पिऊ शकता. आपले डिटॉक्स वॉटर पिण्यासाठी तयार आहे.  

सकाळी उठल्या उठल्या करा ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी-तब्येत एकदम फिट...

डिटॉक्स वॉटर पिण्याचे नेमके फायदे कोणते ? 

१. वजन कमी करतं (Weight loss) :- आपण योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते आणि हीच गोष्ट डिटॉक्स वॉटरच्या बाबतीतही लागू होते. हे पाणी पूर्णपणे आपली पचनक्रिया वाढवण्यासाठी मदत करतं. यामुळे कॅलरीज कमी होतात. डिटॉक्स वॉटर प्यायल्याने ऊर्जेचा स्तर वाढतो. त्यामुळे आपण दिवसभर ताजेतवाने राहता आणि अगदी शरीरातही आपल्याला हलकं हलकं वाटत राहातं. लिंबू व काकडीमध्ये काही विशिष्ट अर्क असतात जे शरीरामध्ये साखर निर्माण करण्याची प्रक्रिया करतात. यामुळे पचनक्रिया वाढते आणि वजन कमी होतं.  

पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी...

२. पचनक्रियेला चालना मिळते (Digestion) :- पचनक्रिया योग्य राखण्यासाठी आणि पोट नियमित स्वरूपात साफ ठेवण्यासाठी शरीरामध्ये योग्य प्रमाणात पाणी जाणं आवश्यक आहे. जास्त वेळ पाणी न प्यायल्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु होऊ शकतो. ज्यामुळे पोट सतत गच्च राहातं आणि सुस्तीही येत राहाते. अशावेळी डिटॉक्स वॉटरमध्ये असलेल्या पोषक तत्वाने आपली पचनक्रिया ही व्यवस्थित राखण्यास मदत होते. भरपूर पाणी प्यायल्याने जेवण व्यवस्थित जिरायला मदत होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

३. ऊर्जा कमी होणार नाही (For energy) :- शरीरामध्ये एक टक्का जरी पाणी कमी झालं तरी त्याचा आपल्या मूडवर वाईट परिणाम होत असतो. तसेच  एकाग्रता कमी होऊन आपलं डोकंही यामुळे दुखू शकतं. कोणतंही डिटॉक्स वॉटर हे नैसर्गिकरित्या जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी, लिव्हर साफ ठेवण्यासाठी आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतं. यामुळे आपल्याला पूर्ण दिवस काम करण्याची एनर्जी राहाते.

४. त्वचेचा ढिलेपणा कमी होतो (Skin Tightning) :- एक विशिष्ट वय झालं की, त्वचेवर फरक जाणवायला लागतो आणि त्वचा लूज पडून लटकू लागते.  पण नियमित डिटॉक्स वॉटरच्या सेवनाने आपले वय दिसून येत नाही. नियमित ऊर्जा मिळत राहिल्याने आपली त्वचा अधिक चमकदार राहते आणि त्याशिवाय आपली त्वचा व्यवस्थित टाईट राहून वय दिसून येत नाही.  

५. त्वचा अधिक तरूण दिसते (Young Skin) :- डिटॉक्स वॉटर नियमित प्यायल्याने त्वचेवर तजेलदारपणा येऊन आपली त्वचा अधिक तरूण दिसते. तसेच  यामुळे चेहेऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि आपली त्वचा अधिक तरूण दिसण्यासाठी मदत होते.

Web Title: This 3-ingredient drink can help detox and lose weight quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.