Join us  

वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2024 12:50 PM

This is how you should drink your tea for weight loss : वजन कमी करायचंय मग चहा कशाला सोडताय? पाहा वेट लॉस दरम्यान, चहा कधी आणि केव्हा प्यावा?..

'तुला वजन कमी करायचंय ना, आधी चहा पिणं बंद करा'. असे अनेक वेळा आपण ऐकलं असेल. पण चहाचा आणि वजनाचा नेमका संबंध काय? चहा हे एक लिक्विड पेय आहे, तरी देखील यामुळे वजन वाढू शकते का? बरेच जण वजन कमी करण्याच्या नादात चहा कायमचा बंद करतात. चहा करण्यासाठी आपण दूध आणि साखरेचा वापर करतो.

दुधात फॅट्स आणि साखरेत कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन वाढणे यासह इतर गंभीर आजार होण्याची शक्यता नाकाराता येत नाही. पण जर आपल्याला चहा सोडायचं नसेल तर, चहा पिऊनही आपण वजन कमी करू शकता(This is how you should drink your tea for weight loss).

यासंदर्भात वेट मॅनेजमेंट आणि हार्मोन हेल्थ स्पेशालिस्ट न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन सांगतात, 'दुधाची चहा पिऊनही आपण वजन कमी करू शकता. वजन कमी करताना आपल्याला आहारातून चहा वगळण्याची काही गरज नाही. पण वजन कमी करताना चहा कधी आणि कसा प्यावा? हे माहित असणं गरजेचं आहे.'

सूर्यफुलाचं तेल वापरलं तर वाढलेलं वजन सरसर कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, तेलाचा इफेक्ट

ते पुढे म्हणतात, 'एक कप चहामध्ये ३३ ते ६६ कॅलरीज असतात. चहा तयार करताना आपण फुल क्रीमऐवजी स्किम्ड किंवा लो फॅट दुधाचा वापर करू शकता. यामुळे चहामधील कॅलरीजचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच एक चमचा साखरेमद्धे ४८ कॅलरीज असतात.

साखरेशिवाय आपण चहा पीत असाल तर, शरीरात कॅलरीजचे प्रमाण जास्त वाढू शकणार नाही. आपण दिवसभरात एकापेक्षा जास्त कप साखरेचा चहा पीत असाल तर, वजन वाढू शकते. त्यामुळे चहा पिताना कॅलरीजवर लक्ष ठेवा. साखरेचे एकूण प्रमाण दररोज एकूण १० ग्रॅम ठेवा. त्यापेक्षा जास्त साखर खाऊ नका.'

चहासोबत काय खाता यावरही लक्ष ठेवा

पोषणतज्ज्ञ सांगतात, 'भारतीय लोकं फक्त चहा पीत नाही. त्यांना चहासोबत रिस्क, बिस्किटे किंवा चिवडा लागतोच. १०० ग्रॅम रस्कमध्ये ४४५ कॅलरीज आणि ३० ग्रॅम साखर असते, तर १०० ग्रॅम चिवड्यामध्ये ५०० कॅलरीज असतात. बिस्किटांमध्येही साखर आणि  कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे चहासोबत हे पदार्थ खाणं टाळाच.'

वेट लॉसदरम्यान चहा कधी प्यावा?

- वजन वाढू नये असे वाटत असेल तर, दिवसभरात २ कप चहापेक्षा जास्त पिऊ नका.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

- जेवणासोबत चहा पिऊ नका. जेवणाच्या आधी किंवा नंतर ४० मिनिटांचा ब्रेक घ्या. नंतरच चहा प्या.

- उपाशीपोटी चहा पिणं टाळा. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते.

- चहा पिण्याच्या ३० मिनिटापूर्वी एक ग्लास पाणी प्या. यामुळे आम्ल पातळी कमी होते. शिवाय पचनाच्या निगडीत समस्या आपल्याला छळणार नाहीत.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स