आयुष्यात कुणी प्रेम केलं नसेल असं कुणी नाही (Breakup Post). प्रेम अशी भावना आहे जी मनात ठरवून येत नाही. कधी कुणावर प्रेम होईल सांगता येत नाही. योग्य व्यक्ती असेल तर, आयुष्य स्वर्गाहून सुंदर होतं (Transformation). पण वाईट असेल तर, आयुष्य उद्धवस्त होतं. अशावेळी ब्रेकअपशिवाय पर्याय उरत नाही. 'मेरे नसीब में तू नहीं शायद' म्हणत आपण मूव्ह ऑन होतो. विसरणे कठीण आहे. पण, ब्रेकअप झाल्यावरही आयुष्य आनंदाने जगता येतं हेही समजून घेणं गरजेचं आहे(This Man's Post-breakup Transformation Wins Internet's Heart).
अशाच एका व्यक्तीने स्वतःला इतकं बदललं की, त्याला ओळखणं कठीण झालं आहे. सुरुवातीला ती व्यक्ती वयस्कर दिसत आहे, पण त्याने व्यायाम करून स्वतःला तारुण्यात बदललं आहे. ब्रेकअप झाल्यानंतर आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू कसं करता येईल? हेच यातून त्या व्यक्तीने दाखवून दिलं आहे. डिप्रेशनमध्ये न जाता, आनंदाने यू-टर्न कसा मारायचा? हे त्याने दाखवून दिलं.
हा चमत्कार कसा झाला?
अलीकडेच या व्यक्तीने सोशल मीडिया साइट रेडिटवर आपली लव्ह लाईफची संपूर्ण कहाणी शेअर केली आहे. यात त्याने ब्रेकअपनंतर स्वतःला कसं बदललं हे सांगितलं आहे. यात तो म्हणाला, 'ब्रेकअपनंतर मी वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केलं. केसांचीही समस्या होती, म्हणून मी हेअर ट्रान्सप्लांट केलं. वेट लॉस आणि हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे पुन्हा मी तारुण्यात पदार्पण करू शकलो.'
सद्गुरू सांगतात, कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; मिळेल ताकद इतकी की..
फोटो शेअर करीत त्या व्यक्तीने लिहिलं की, 'मी रिलेशनशिपमध्ये खुश नव्हतो. पण ब्रेकअपनंतर माझा चेहरा उजळला. एक वर्षापूर्वी माझं ब्रेकअप झालं, त्यानंतर मी नियमितपणे जीमला जाऊ लागलो. त्याचा हा परिणाम आहे.'
पोस्टवर अनेकांच्या सकारात्मक कमेंट्स
जरा चाललं की लगेच दम लागतो? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; वाढेल स्टॅमिना - हाडंही राहतील मजबूत
नेटकऱ्यांनी हा बदल आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे. नुकतंच पोस्ट केलेला फोटो पाहून, सर्वजण थक्क झाले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मस्त ग्लो अप आहे, मला वाटतं काही लोक तुला ओळखणारही नाहीत, अशा कमेंट या पोस्टवर आल्या आहेत. तर काहींना ब्रेकअप का झालं होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.