शरीर एकदम थरथर कापू लागणे, खूप घाम येणे, चिडचिड होणे, मध्येच भीती वाटणे, मुड स्विंग असे अनेक त्रास थायरॉईड (how to control thyroid) असणाऱ्या व्यक्तींना सतत जाणवतात. हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉईड असे दोन प्रकार या आजारात दिसून येतात. कोणत्याही प्रकारचा थायरॉईड असला तरी त्यामुळे होणारा त्रास निश्चितच कंट्रोल करता येतो. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घेण्यासोबतच काही व्यायाम नियमितपणे करण्याची गरज असते. थायरॉईड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कोणते व्यायाम केले पाहिजेत, याविषयीची माहिती इन्स्टाग्रामच्या yoginisrishti या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे.
थायरॉईड कंट्रोल करण्यासाठी उपयुक्त ठरणारे व्यायाम
१. ओमकार
ओमकार नाद करताना आपल्या कंठातून जे स्वर निघतात, त्याचा शरीरावर खूप सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे नियमितपणे ३ ते ४ वेळा ओंकार करा. यासाठी सुरुवातीला दिर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडत ओंकार म्हणा.
२. भुजंगासन
थायरॉईड कंट्रोल करण्यासाठी भुजंगासन उपयुक्त ठरते. भुजंगासन करण्यासाठी सुरुवातीला पोटावर झोपा. यानंतर दोन्ही हात कोपरातून वाकवून छातीच्या दोन्ही बाजुला ठेवा. हळूहळू श्वास घेत डोके, मान, छाती उचला. नजर छताकडे केंद्रित करा. मानेचे स्नायू शक्य होतील तेवढे ताणण्याचा प्रयत्न करा.
३. उष्ट्रासन
उष्ट्रासन करण्यासाठी आधी वज्रासनात बसा. यानंतर गुडघ्यांवर उभे रहा. दोन्ही हात मागे नेऊन पायाच्या घोट्यावर ठेवा. हळूहळू मानदेखील मागे करा. तुमच्या मानेची अशी अवस्था असावी की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मागची भिंत दिसू शकेल. ही आसनस्थिती काही सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हळूहळू आसन सोडा.
४. वज्रासनात बसा. दोन्ही हात मागे नेऊन एकमेकांत गुंफून घ्या. यानंतर श्वास घ्या आणि हात मागे न्या तसेच मान वर न्या. नजर छताकडे स्थिर ठेवा. शक्य तेवढी मान मागे नेण्याचा प्रयत्न करा.