Join us  

दररोज जेवणापूर्वी करा फक्त १ साधंसोपं काम, पोटावरची चरबी घटेल आणि दिसाल एकदम सुडौल-फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:43 AM

Tips for Weight Loss That Actually Work : उन्हाळ्यात वेगवेगळे काढे शरीराला उष्ण पडतात आणि बेली फॅट कमी करायचं तरी कसं असा प्रश्न पडतो.

सतत बसून वजन वाढण्याची समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे. एकदा वजन वाढलं की कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करूनही उपयोग होत नाही. अनेकजण  वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण सोडतात तर काहीजण कमी खातात. (Weight loss tips)

डॉ. अमृता कुलकर्णी यांनी वजन कमी करण्यासाठी जेवणाआधी काही उपाय करण्याचा सल्ला दिला. बडीशेप जेवणानंतर खाल्ली जाते पण हेच जर जेवणाआधी घेतलं तर छान बेली फॅट कटर ड्रिंक होऊ शकतं. उन्हाळ्यात वेगवेगळे काढे शरीराला उष्ण पडतात आणि बेली फॅट कमी करायचं तरी कसं असा प्रश्न पडतो.(Tips for Weight Loss That Actually Work)

 

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाआधी एक घरगुती ड्रिंक घेतल्यानं वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. दिवसभरात एकच कप घेतलं तरी चालेल.  एक कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळवा. जास्त न उकळून देता फक्त १ ते २ मिनिटं हे मिश्रण उकळू द्या. मग गाळून हे ड्रिंक प्या. याचे तीन फायदे होतात.

१ किलो दह्याच्या चक्क्यापासून घरीच करा ताजं, स्वादीष्ट श्रीखंड; चवीला अप्रतिम, परफेक्ट रेसिपी

बेली फॅट कटर ड्रिंकचे फायदे

१) शरीराला गारवा मिळतो कारण बडीशेप उष्णता कमी करते.

२) भूक कमी लागते त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं

३) पोटावरची चरबी होऊ लागते. कारण बडीशेपेचं पाणी चांगलं फॅट कटर ड्रिंक आहे.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल