Lokmat Sakhi >Fitness > ना व्यायामची कटकट, ना डाएटची झंझट; आर्म फॅट कमी करण्यसाठी वापरा खास घरगुती उपाय

ना व्यायामची कटकट, ना डाएटची झंझट; आर्म फॅट कमी करण्यसाठी वापरा खास घरगुती उपाय

Tips for loss arms fat : रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे स्वतःकडे फारसं लक्ष देता येत नाही. परिणामी शरीर मेंटेन राहत नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 03:19 PM2021-05-20T15:19:18+5:302021-05-20T15:37:39+5:30

Tips for loss arms fat : रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे स्वतःकडे फारसं लक्ष देता येत नाही. परिणामी शरीर मेंटेन राहत नाही. 

Tips for loss arms fat : Best homemade masks to get rid of arms fat | ना व्यायामची कटकट, ना डाएटची झंझट; आर्म फॅट कमी करण्यसाठी वापरा खास घरगुती उपाय

ना व्यायामची कटकट, ना डाएटची झंझट; आर्म फॅट कमी करण्यसाठी वापरा खास घरगुती उपाय

Highlightsखासकरून मांड्या, छाती,  दंडांवर वाढलेली चरबी लगेचच दिसून येते. नेहमीच व्यायाम करून आर्म फॅट कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आज आम्ही तुम्हाला एक वेगळा प्रकार सांगणार आहोत.

सुंदर आणि  तरूण दिसण्यासाठी नेहमीच महिला महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स,  वर्कआऊट करत असतात. पण शरीराच्या काही अवयवांवर जमा झालेली चरबी काही केल्या कमी होत नाही. स्लिम, फिट दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे स्वतःकडे फारसं लक्ष देता येत नाही. परिणामी शरीर मेंटेन राहत नाही. 

खासकरून मांड्या, छाती,  दंडांवर वाढलेली अतिरिक्त चरबी लगेचच दिसून येते. नेहमीच व्यायाम करून आर्म फॅट कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आज आम्ही तुम्हाला एक वेगळा प्रकार सांगणार आहोत.  व्यायाम आणि घरगुती उपचारांसह आर्म फॅट कमी करता येतो. तुम्ही घरी तयार केलेले पॅक वापरुन आर्म फॅट कमी करू शकता. चला तर मग आर्म फॅट कमी करण्यासाठी घरगुती पॅक कसा तयार करायचा जाणून घेऊया

हळदीचा पॅक

आर्म फॅट कमी करण्यासाठी हळदीचा पॅक हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा दही आणि एक चमचा चण्याच्या डाळीचं पीठ  घ्या. या मिश्रणाला एकजीव करून पेस्ट तयार करून घ्या.  ही पेस्ट २० मिनिटं आपल्या आर्म्सना लावू ठेवा. त्यानंतर हात पाण्यानं धुवून टाका.  आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यानं आर्म फॅट कमी होण्यास मदत होईल. 

अंड

आर्म्सना परफेक्ट शेप देण्यासाठी अंड फायदेशीर ठरतं. आर्म फॅट लॉस करण्यासाठी एका अंड्याचा पांढरा भाग, १ चमचा दूध, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध चांगलं एकजीव करून घ्या. या मिश्रणाची पेस्ट तयार करून आपल्या आर्म्सना लावा. २० मिनिटांनंतर कोमट पाण्यानं स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून दोनवेळा तुम्ही या पॅकचा वापर करू शकता.

हॉट टॉवेल

या उपायासाठी सगळ्यात आधी गरम पाणी करून घ्या. पाणी थोडं कोमट झाल्यानंतर त्यात टॉवेल बुडवून पिळून घ्या. त्यानंतर हा हलका गरम टॉवेल आपल्या हातांभोवती गुंडाळा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हॉट टॉवल ट्रीटमेंट  केल्यानं हातांवरची चरबी कमी होण्यास मदत होईल. 

ग्लिसरिन

ग्लिसरिनचा वापर करून आर्म फॅट कमी करता येऊ शकतं.  सगळ्यात आधी ग्लिसरिन आणि अर्धा चमचा मीठ घ्या. दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण हातांना लावल्यानंतर २० मिनिटांनी स्वच्छ पाण्यानं धुवून टाका.

दूधानं मसाज करणं

एक चमचा दूध आणि मध मिसळून या मिश्रणानं तुम्ही हातांची मालिश करू शकता. मसाज केल्यानंतर हात पाण्यानं स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून तीन ते चार वेळा  हा प्रयोग केल्यानं  तुमच्या शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय काही सोप्या व्यायाम प्रकारांनी तुम्ही हातांवरची चरबी कमी करू शकता. 

बटरफ्लाय एक्सरसाईज 

या एक्सरसाईजच्या मदतीने तुमच्या केवळ हाताचीच चरबी नाही तर, शरीरातील अन्य भागाची चरबीदेखील कमी होते. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सरळ रेषेत उभं राहून दोन्ही हात समोर उभे करायचे आहेत. आता हात खाद्यांच्या रेषेत समोर आणून तळवे जमिनीच्या दिशेने ठेवा. आता हात घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरवा. मग पुन्हा उलटे फिरवा. असं कमीत कमी १५ ते २० वेळा करा.

ट्रायसेप्स डिप्स

चरबी कमी करण्यासाठी ट्रायसेप्स डिप्स हा प्रभावी पर्याय आहे. यासाठी तुम्ही एका खुर्चीवर बसा आणि तुमचे हात खुर्चीच्या किनाऱ्यावर ठेऊन खुर्ची पकडा आणि आपले पाय समोर घ्या. आता तुमचं शरीर थोडं पुढे घ्या आणि आपले पाय सरळ ठेवा आणि तुमचे हात मागे घ्या जेणेकरून तुम्ही स्वतःला नीट पकडू शकाल. तुमचं शरीर जमिनीवरून नीट उचललं गेलं आहे की नाही याची नीट खात्री करून घ्या. हळू हळू तुमच्या ट्रायसेप्सचा उपयोग करून शरीर उचला आणि मग परत खाली आणा. पहिल्यांदा याचे तीन सेट करा आणि नंतर हळू हळू वाढवत रोज  सेट पूर्ण करा.

Web Title: Tips for loss arms fat : Best homemade masks to get rid of arms fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.