Lokmat Sakhi >Fitness > पोटावरबी चरबी लवकर कमी करायची तर रोज सकाळी ‘खास’ उपाय करा, वजन घटवण्याचं सिक्रेट

पोटावरबी चरबी लवकर कमी करायची तर रोज सकाळी ‘खास’ उपाय करा, वजन घटवण्याचं सिक्रेट

Tips to loss Belly Fat Quickly : एकदा पोटाचा घेर वाढला की अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाही. सकाळ संध्याकाळ चालायला जाणं, जीमध्ये व्यायाम करणं प्रत्येकालाच शक्य होतच असं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 09:22 AM2023-05-23T09:22:00+5:302023-05-23T15:04:44+5:30

Tips to loss Belly Fat Quickly : एकदा पोटाचा घेर वाढला की अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाही. सकाळ संध्याकाळ चालायला जाणं, जीमध्ये व्यायाम करणं प्रत्येकालाच शक्य होतच असं नाही.

Tips to loss Belly Fat Quickly : Simple Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life | पोटावरबी चरबी लवकर कमी करायची तर रोज सकाळी ‘खास’ उपाय करा, वजन घटवण्याचं सिक्रेट

पोटावरबी चरबी लवकर कमी करायची तर रोज सकाळी ‘खास’ उपाय करा, वजन घटवण्याचं सिक्रेट

शरीर फिट आणि टोन्ड दिसण्यासाठी लोक व्यायाम, योगा करतात. अनहेल्दी सवयी आपलं पोट आणि कंबरेजवळील चरबी वाढण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे शरीराचा ओव्हरऑल शेप बिघडतो याचा परिणाम आत्मविश्वासावरही होतो. (Tips to loss Belly Fat Quickly) एकदा पोटाचा घेर वाढला की अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाही. सकाळ संध्याकाळ चालायला जाणं, जीमध्ये व्यायाम करणं प्रत्येकालाच शक्य होतच असं नाही. सकाळी उठल्यानंतर काही ड्रिंक्सचे सेवन केले तर फरक जाणवेल.(Simple Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life)

ग्रीन टी

ग्रीन टी नेहमी दूध आणि साखरेला उत्तम पर्याय समजली जाते. यासाठी रोज सकाळी रिकाम्यापोटी ग्रीन टी प्यायला हवी. याची चव कडवट असते पण ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

लिंबू पाणी

लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी एक स्वस्त पर्याय आहे. यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात १ लिंबू पिळा आणि काळ्या मिठासह मिसळून हे पाणी प्या. नियमित हा उपाय केल्यास लवकर वजन कमी करण्यास मदत  होईल

ओव्याचं पाणी

ओवा सर्वांच्याच स्वंयपाकघरात उपलब्ध असतो. याला कॅरम सिड्स असंही म्हणतात.  ओवा खाल्ल्यानं मेटाबॉलिझ्म रेट वाढतो यामुळे वजन कमी करणं सोपं होतं. तुम्ही १ ग्लास पाण्यात ओवा मिसळा आणि सकाळी हे पाणी गाळून प्या.

मेथीचं पाणी

मेथीचे दाणे प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात असतात. त्यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे भूक कमी होते, त्यामुळे खाण्याची इच्छा कमी होते आणि एखादी व्यक्ती जास्त खाणे टाळू शकते. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो. या बिया शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील उपयुक्त ठरू शकतात. तसेच चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

नारळपाणी

नारळाच्या पाण्यात फायबर, पोटॅशियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. हे पचन आणि शोषण सुधारते आणि चयापचय दर वाढवते.

भाज्यांचा रस

फायबरसोबतच इतरही अनेक पोषक घटक भाज्यांच्या रसामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. वजन कमी करण्यासाठी हे चांगले पर्याय असू शकतात. एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की ज्यांनी आहारात संतुलित आहारासोबत भाज्यांचे रस घेतले त्यांचे वजन जास्त कमी झाले आहे.

Web Title: Tips to loss Belly Fat Quickly : Simple Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.