Join us  

जिम की मॉर्निंग वॉक? कशाने लवकर वजन कमी होते? आरोग्यासाठी काय फायद्याचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2023 5:06 PM

To Lose Weight: Morning Walk Or Gym? : अनेक जण जिम आणि मॉर्निंग वॉकमध्ये कन्फ्युज असतात, वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचं?

फिट राहण्यासाठी अनेक लोकं विविध प्रकारचे व्यायाम करतात. काही लोकं जिम, योगा किंवा डाएट फॉलो करून वजन कमी करतात. तर काही सकाळी वॉकला जाण्यास प्राधान्य देतात. परंतु, मॉर्निंग वॉक आणि जिममध्ये फरक काय? मॉर्निंग वॉक की जिम, कशामुळे वजन लवकर कमी होते?

वजन कमी करण्यासाठी लोकं जिमलाही जातात, यासह मॉर्निंग वॉकही करतात. परंतु, दोघांपैकी एक शरीरासाठी योग्य काय? याची माहिती पोषणतज्ज्ञ आणि फिटनेस एक्स्पर्ट पायल अस्थाना यांनी दिली आहे(To Lose Weight: Morning Walk Or Gym?).

जिम एक्सरसाईज आणि मॉर्निंग वॉकमधला फरक

- जिममध्ये जाऊन आपण अनेक प्रकारचे एक्सरसाईज करू शकता. जिममध्ये नियमित व्यायाम केल्याने मसल्स तयार होतात. तर मॉर्निंग वॉक केल्याने फक्त कॅलरीज बर्न होतात. मॉर्निंग वॉकसाठी आपल्याला बाहेर जावे लागते. तर, जिम वर्कआउट्स आपण आपल्या सोयीनुसार व्यायामशाळेत जाऊन करू शकता. जर आपल्याला वॉक आवडत असेल तर, जिममध्ये आपण ट्रेडमिल वॉक करून कॅलरीज बर्न करू शकता.

नाश्त्याला इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात इडली खावी?

- जिममध्ये गेल्याने कॅलरीज लवकर बर्न होतात. कारण जिममध्ये शरीराच्या प्रत्येक भागाचा व्यायाम होतो. मॉर्निंग वॉक केल्याने आपण फिट होऊ शकतो. पण याचा फरक लवकर दिसून येत नाही. ज्यांना कमी खर्चात वजन कमी करायचं असेल तर, त्यांनी मॉर्निंग वॉक करावे. जर आपल्याला पूर्ण बॉडी टोन्ड करायची असेल तर, जिममध्ये वर्कआउट करा.

ना जिम - ना डाएट, रोज सकाळी ५ पैकी १ मॉर्निंग ड्रिंक प्या, वजन आणि पोटही होईल कमी

वजन कमी करण्यासाठी जिम वर्कआउट करावे की मॉर्निंग वॉक?

उत्तम आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक आणि जिम दोन्ही गोष्टी फायदेशीर ठरतात. पण या दोन्ही गोष्टी आपल्याला शारीरिक क्षमतेवर अवलंबून असतात. जर आपल्याला कमी वेळात फिट व्हायचं असेल तर, जिममध्ये वर्कआउट करा. जर आपल्याला फक्त फिट राहायचं असेल किंवा हेवी वर्कआउट करायचं नसेल तर, मॉर्निंग वॉक करा. काही लोकं व्यायामाला टाळतात, किंवा ज्यांना आळस येतो, त्यांनी मॉर्निंग वॉक करावे.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स