Lokmat Sakhi >Fitness > हिवाळ्यात कोलेस्टेरॉल कमी करायचे तर खा ५ फळे, तब्येत ठेवा तंदुरुस्त

हिवाळ्यात कोलेस्टेरॉल कमी करायचे तर खा ५ फळे, तब्येत ठेवा तंदुरुस्त

Cholesterol Winter Fruits सफरचंद, स्ट्रॉबेरी, एवोकॅडो या फळांचा आजच करा आहारात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 08:00 PM2022-11-03T20:00:30+5:302022-11-03T20:01:44+5:30

Cholesterol Winter Fruits सफरचंद, स्ट्रॉबेरी, एवोकॅडो या फळांचा आजच करा आहारात समावेश

To reduce cholesterol in winter, include these 5 fruits in your diet, will keep cholesterol under control | हिवाळ्यात कोलेस्टेरॉल कमी करायचे तर खा ५ फळे, तब्येत ठेवा तंदुरुस्त

हिवाळ्यात कोलेस्टेरॉल कमी करायचे तर खा ५ फळे, तब्येत ठेवा तंदुरुस्त

ir="ltr">हिवाळ्यात अनेकवेळा जिम किंवा योगासना करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिकपटीने वाढते. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. एलडीएल कोलेस्टेरॉल आणि एचडीएल कोलेस्टेरॉल. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम करणे तितकेच महत्वाचे आहे. जर, आपल्याला कोलेस्टेरॉल नियंत्रित करायचे असेल तर काही फळांचा आहारात आवर्जुन वापर करायला हवा.

सफरचंद

सफरचंदमध्ये अनेक उत्तम गुणधर्म आहेत जे शरीरातील आजारांपासून लांब ठेवण्यास मदत करते. सफरचंद खाल्ल्याने वाढलेली कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यासही मदत होईल. सफरचंदांमध्ये पेक्टिनचे प्रमाण जास्त असते, जे फायबर असते आणि शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकते.

स्ट्रॉबेरी

हिवाळ्यात सर्वत्र उपलब्ध अस्रणारे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. हे फळ कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, ज्याचा फायदा आपल्या शरीराला होतो.

लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत.लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने अनेक आजार लांब राहतात. या हिवाळ्यात आपण संत्री आणि लिंबू खाऊ शकता. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल. लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्त्रोत आहेत आणि रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवतात.

एवोकॅडो

एवोकॅडो आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. त्यात फोलेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज, फॉस्फरस इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. एवोकॅडोचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. त्याच्या सेवनाने साखर नियंत्रित राहते. त्याच वेळी, खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यासाठी रोज अॅव्होकॅडोचे सेवन करा.

द्राक्षे

द्राक्ष खाण्याचे अनेक फायदे आहेत. द्राक्ष तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. याला तुम्ही हिवाळ्यातील हेल्दी नाश्ताही म्हणू शकता. द्राक्षे खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, कोलेस्टेरॉल देखील कमी होईल.

मात्र, काही झाले तरी फळांचे सेवन माफक प्रमाणात करा. कारण, त्यात फ्रुक्टोज असते आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने साखरेचे प्रमाण वाढू शकते.

Web Title: To reduce cholesterol in winter, include these 5 fruits in your diet, will keep cholesterol under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :HealthHealth TipsWinter Care TipsLifestyleआरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजीलाइफस्टाइल