Join us

आई झाल्यानंतर वजन वाढलं, व्यायामाला वेळच नाही? करा फक्त २ सोपे व्यायाम, व्हा फिट आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2023 15:19 IST

Top 2 Exercises for Busy Moms Working or Staying At Home संसाराचा गाडा हाकून दमली तरी स्वतःला वेळ द्यायला हवाच ना आईने? Mother's Day 2023

एका आईला दररोज अनेक जबाबदाऱ्या पार पाडावे लागतात. तिचा संपूर्ण दिवस तिचा संसार सांभाळण्यात जातो. आपल्या मुलांचे संगोपन व संसाराचा गाडा हाकताना, ती स्वतःकडे लक्ष द्यायला विसरते. ज्यामुळे तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. ती स्वतःच्या आरोग्याकडे व आहाराकडे दुर्लक्ष करते. ज्यामुळे महिलांचे वजन वाढू लागते आणि पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते. पोटावरील चरबीमुळे महिलांना हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि हार्मोनल असंतुलनाचा धोका वाढतो. पोटाची चरबी दूर ठेवण्यासाठी चरबी कमी होणे आणि मजबूत कोर आवश्यक आहे. जर महिलांना स्वतःसाठी वेळ द्यायला जमत नसेल तर, हे २ व्यायाम नियमित वेळात वेळ काढून करा. ज्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी घटेल, व शरीर सुडौल दिसेल(Top 2 Exercises for Busy Moms Working or Staying At Home).

लेग सर्कल्‍स

लेग सर्कल्‍स हा व्यायाम रोज केल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होते. याशिवाय, पाय आणि मांड्यांची देखील चरबी कमी होते. ज्यामुळे स्नायू मजबूत आणि लवचिक होतात.

चाळीशीनंतर महिलांचं वजन का वाढतं? वय वाढलं की वजन वाढतंच का? तज्ज्ञ सांगतात, एक उपाय

यासाठी बेडवर पाठीवर झोपावे. पाय सरळ आणि हात बाजूला ठेवा. नंतर दोन्ही पाय बेडच्या ३ इंच वर उचलून सरळ करा. आता पायांनी घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने लहान वर्तुळे करा. मग पाय परत बेडवर आणा. हे किमान 15 वेळा करा.

बटरफ्लाय सिट्स-अप्‍स

हा व्यायाम पाठीवर झोपून आणि डोके वर करून केला जातो. हा व्यायाम केल्याने कोर स्नायू मजबूत होतात. ऍब्स टोन करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो.

काटेकोर डाएट व व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? ५ चुका टाळा, तरच घटेल वजन..

हा व्यायाम करण्यासाठी, बेडवर आपल्या पाठीवर झोपा. त्यानंतर गुडघे वाकवून पायांचे तळवे एकत्र करा. दोन्ही हात मानेमागे घेऊन पकडून ठेवा. आता श्वास घेताना पोट आतल्या बाजूने ओढा. नंतर हळूहळू श्वास सोडा. यानंतर डोकं वर उचलून स्नायूंवर जोर द्या. आता नितंबांना वर उचला आणि शरीराला 70 अंशांपर्यंत न्या. हा व्यायाम निदान १० वेळा करा.

टॅग्स :फिटनेस टिप्समदर्स डेहेल्थ टिप्स