नवे वर्ष सुरू झाले की नवे संकल्प केले जातात. यात मुख्य भर हा प्रामुख्याने व्यायाम करण्यावर, डाएटिंगवर, आरोग्यावर (health, diet and fitness) असतो. पण बहुतांश लोकांच्या बाबतीत असं होतं की नव्या वर्षाचे नऊ दिवस सरले की हे सगळे संकल्पही हळूहळू बारगळू लागतात. म्हणून आरोग्य, फिटनेस जपायचा असेल तर प्रत्येकाने कोणत्या ३ गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही खास माहिती. त्या म्हणतात की आहार चांगला घ्यावा, व्यायाम करावा असे शेकडो संकल्प (Top 3 health resolutions for new year) शेकडो लोक दरवर्षी करत असतात. पण तुम्हाला खरोखरच तुमच्या आरोग्याच्या ध्येयापर्यंत पोहाेचायचं असेल तर या काही गोष्टींकडे लक्ष द्या..
नव्या वर्षाचे संकल्प करताना..
१. सातत्य
आहार आणि व्यायाम याविषयीचे नवे संकल्प नव्या वर्षासाठी करणार असाल तर त्यात सातत्य ठेवणे भाग आहे.
न्यू इयर पार्टीचं जेवण एन्जॉय करताना शुगर वाढणार नाही ना? ३ गोष्टी लक्षात ठेवा- शुगर कंट्रोलमध्ये
आज केलं उद्या सोडून दिलं, पुन्हा सरु केलं.... असं केलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. सातत्य असेल तरच तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम दिसू शकतात.
२. स्वतःला ओळखा..
तुमच्या तब्येतीनुसार तुमचे आरोग्याचे नेमके ध्येय कोणते ते ओळखा. उगाचच सगळ्यांनी एका प्रकारचा व्यायाम सुरू केला म्हूणन त्याच प्रकारचा व्यायाम तुम्हीही करावा, असे नसते.
इंडियामे क्या चल रहा है? कोण आणि का आहे व्हायरल? - वर्षभराची झलक झटक्यात सांगणारी गोष्ट
त्यामुळे स्वत:च्या शारीरिक क्षमता आणि आवड ओळखून त्या पद्धतीचा व्यायाम ठरवा. हेच आहाराच्या बाबतीतही लागू होते. स्वतःची प्रकृती ओळखून त्याप्रमाणे आहार ठरवा आणि त्यात सातत्य ठेवा. कुठल्या प्रकारचे अन्न खाल्ल्यानंतर त्रास होतो हे आपले आपल्याला माहिती असतेच. त्यानुसार आहार ठरवा.
३. मनाचे आरोग्य
शरीरासोबत मनाचे आरोग्याही उत्तम असणे गरजेचे आहे. म्हणूनच संयम ठेवा. राग, लोभ, मत्सर ,द्वेष, निंदा यांचा शरीर आणि मनावर परिणाम होतो. म्हणून त्या गोष्टी कमी करा.