Join us  

कोण म्हणतं बटाटे-भात खाल्ल्यानं वजन वाढतं? हेल्दी कार्ब्ज देणारे ४ पदार्थ खा, मेंटेन राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 9:43 PM

Top 4 Best And Healthy Carbohydrate Source : कार्बोहायड्रेट आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे.

लोकांनी हेल्दी खाण्याच्या नादात आपल्या आहारातून कार्ब्स पूर्णपणे वगळले आहेत. लोकांच्या म्हणण्यानुसार कार्ब्स नेहमीच तब्येतीसाठी खराब असतात. कार्ब्स खाल्ल्यानं लठ्ठपणा, हृदयाचे आजार, हाय कोलेस्टेरॉल, डायबिटीस असे आजार उद्भवू शकतात. लोक कार्बोहायड्रेट्सयुक्त आहार घ्यायला का घाबरतात ते समजून घेऊ. (Top 4 Best And Healthy Carbohydrate Sources According To A Dietitan)

कार्बोहायड्रेट आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. आपण दिवसभरात जवळपास ४५ ते ६० कार्बोहायड्रेट्स घ्यायला हवेत. पण सर्व प्रकारचे कार्ब्स एकसारखे नसतात.  जास्त गोड पदार्थ, मिठाई, प्रोसेस्ड फूड, स्नॅक्स आजार निर्माण करू शकतात. टुडे डॉटमध्ये  छापलेल्या एका रिपोर्टनुसार ९ वर्षांचा अनुभव असलेल्या डायटिशियन सांगतात की,  कार्बोहायड्रेट एक आवश्यक मॅक्रोन्युट्रिएंट आहे जे आपल्या हेल्दी मीलचा एक  भाग असायला हवे.

मटार

एक कप शिजवलेल्या मटारमध्ये २५ ग्रॅम कार्ब्स,  ८ ग्रॅमपेक्षा जास्त प्लांट बेस्ड प्रोटीन असते. मटारमध्ये व्हिटामीन सी, के याव्यतिरिक्त फॉलेट असते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर स्टार्चनं परिपूर्ण असलेल्या डाळी पोषणाने परीपूर्ण असतात.

पिअर

आपल्या आहारात पिअरचा समावेश असायला हवा. हे फळ फायबर्सनी परीपूर्ण असते. याशिवाय यातून २७ ग्रॅम कार्ब्स मिळतात. जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर यात ६ ग्राम फायबरर्स असतात. पिअरमध्ये व्हिटामीन सी आणि पोटॅशियम असते ज्यामुळे इम्यून सिस्टीम आणि हार्ट हेल्थ चांगली राहते. 

बटाटा

बटाट्याची भाजी सर्वाच्याच घरी बनते. आजकाल  लोक बटाट्याचा समावेश आहारात करतात कारण बटाटा कार्ब्सचा उत्तम स्त्रोत आहे. बटाटा आणि रताळे या दोन्हींमध्ये हेल्दी कार्ब्स असतात. यात पोषक तत्व असतात जी शरीराला  हेल्दी ठेवतात. रताळे आणि बटाटे यात १० टक्के फायबर्स असतात. रताळांमध्ये एंटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन ए असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. 

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल

डाळी

प्रत्येकाच्या घरांमध्ये डाळ बनवली जाते. एक कप शिजवलेल्या डाळीत जवळपास ४० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय १८ ग्रॅम प्रोटीन आणि १६ ग्रॅम फायबर्स असतात.  शरीराला काम आणि वर्कआऊटबरोबर करण्यासाठी कार्ब्सची गरज असते. डाळीत एनर्जीबरोबरच प्रोटीन असते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं.  डाळीतून तुम्हाला पोटॅशियम, फॉलेट्, आयर्नसुद्धा मिळते ज्यामुळे ब्लड फ्लो चांगला राहतो. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल