कंबर आणि पोटाच्या दोन्ही बाजूंना फॅट्स जमा झाले की त्याला लव हॅण्डल्स असे म्हणतात. (Fitness tips) लव्ह हॅण्डल कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम पद्धत म्हणजे व्यायाम आणि योगा करणं. (Barik honyasathi kay karave) याचा लव्ह हॅण्डल्सवर थेट परिणाम होतो. यामुळे पूर्ण शरीराचे फॅट कमी होते याशिवाय लव्ह हॅण्डल्सही शेपमध्ये येतात. (Top 4 Exercise For belly Fat Loss) यात कंबरेचा भाग पातळ दिसू लागतो. कंबर सडपातळ दिसावी तसंच फ्लेक्सिबिलीटी आणि स्ट्रेंथ वाढण्यासाठी तुम्ही काही सोप्या व्यायाम प्रकारांचा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये समावेश करू शकता. (Exercise of belly Fat loss)
1) बोट पोज (Boat Pose)
योग जर्नलच्या रिपोर्टनुसार बोट पोज एक योगासन आहे ज्यामुळे कंबरेच्या आजूबाजूचे फॅट कमी होते आणि कोअर मसल्सची सु्दधा स्ट्रेंथ वाढते. बोट पोज करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर पाय समोर पसरवून सरळ बसा. त्यानंतर हात समोर ठेवून पुढच्या बाजूने पाय वर उचला. हिप्सच्या आधाराने तुम्हाला ही पोज बॅलेंन्स करावी लागेल. जवळपास १ मिनिटं या मुद्रेत राहा नंतर सामान्य स्थितीत या.
2) कोबरा पोझ (Kobra Pose)
ही पोज केल्यानं पोट आणि कंबरेच्या आजूबाजूची चरबी कमी होऊ लागते. कोबरा पोज करण्यासाठी सगळ्यात आधी पोटावर झोपा. नंतर दोन्ही पाय मागच्या बाजूने ठेवा. नंतर छातीपासून हात वर उचला ३० सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीत या. हे योगासन तुम्ही रोजही करू शकता.
3) बायसिकल क्रंचेस (Bicycle Crunches Exercise)
बायसिकल क्रंचेस करण्यासाठी सगळ्यात आधी पोटावर झोपा. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत वाकून घ्या. हळू हळू पाय पुढे मागे करा. अशा स्थितीत सायकल चालवून पुढे मागे जात राहा.नंतर दोन्ही हात डोक्यावर ठेवा.
4) प्लँक्स (Planks Exercise)
प्लँक हा व्यायाम लव्ह हॅण्डल कमी करण्यासाठी आणि कोअर मसल्सचा मजबूत बनवण्यासाठी हा परफेक्ट व्यायाम आहे. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हात कोपरात वाकवून जमिनीवर ठेवा आणि हातांच्या वजनावर शरीर बॅलेंन्स करा. या पोजमध्ये थोडा वेळ राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीत या. तुम्ही साईड प्लँक्सप्रमाणेसुद्धा हा व्यायाम करू शकता. ज्यात शरीरा एका बाजूला झुकवा.