लठ्ठपणा सध्याच्या स्थितीत एक गंभीर समस्या बनलं आहे. लाईफस्टालमध्ये बदल, अनहेल्दी खाण्यापिण्याच्या सवयी, ताण-तणाव यामुळे वजन कमी करणं सर्वांनाच शक्य होत असं नाही. (Weight Loss tips) लोक आपलं पोट कमी करण्याबाबत विचार करतात पण योग्य डाएट फॉलो न केल्यानं आणि व्यायाम न केल्यान हवातसा परीणाम दिसून येत नाही. शरीरात जमा झालेले एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी आणि कंबर पातळ दिसण्यासाठी तुम्हाला अशा सुपरफूड्सबाबत सांगणार आहोत. ज्यांचा आपल्या आहारात समावेश करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. (Foods For weight loss)
वजन कमी करण्यासाठी कोणते ५ पदार्थ खायचे?
1) चिवडा
चिवडा भारतभरात खाल्ला जाणारा एक सामान्य पदार्थ आहे. कुरकुरीत आणि स्वादीष्ट स्नॅक्स लोकांना खायला खूप आवडतात. चिवडा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम ऑपश्न आहे. हा एक हेल्दी ब्रेकफास्ट ऑपश्न आहे. अशा स्थितीत चिवडा एक हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन ठरू शकतो. चिवडा हे कमी कॅलरी असलेले अन्न आहे. चिवडा मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास वजन कमी करण्याचा आरोग्यदायी नाश्ता होऊ शकतो.
2) पनीर
वजन कमी करण्यावर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की पनीरमध्ये कमी कॅलरी आणि फॅट कमी आहे, त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात त्याचा समावेश केला पाहिजे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांसाठी हा स्नॅकचा एक उत्तम पर्याय मानला जातो, कारण यामुळे पोट बराच काळ भरलेलं वाटतं, ज्यामुळे आपल्याला काहीही अन्हेल्दी खाण्यापासून रोखले जाते.
3) गाजर
गाजर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो कारण यात खूप कमी कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हील हेल्दी पदार्थांच्या शोधात असाल तर गाजर खाऊ शकता. गाजरातील फायबर्स भूक कमी करण्यास मदत करतात. गाजरात व्हिटामीन आणि खजिनांसारखे व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, व्हिटामीन बी ६ आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.
४) कोबी
वजन कमी करण्यासाठी तुम्ही पत्ता कोबीचे सेवन करू शकता यात कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. कोबीमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असते, ज्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात कोबीचा रस, सूप, उकडलेल्या भाज्या किंवा चाट यांचा समावेश करू शकता, पण कोबी नीट धुऊनच खा.
५) काळी मिरी
काळी मिरी वजन कमी करण्यास मदत करते. काळी मिरी चयापचय वाढवण्यासाठी चरबीच्या पेशी तोडण्यास मदत करते. काळी मिरी चयापचय सुधारण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. सॅलेड किंवा भाजीमध्ये तुम्ही काळीमिरीचा वापर करू शकता.