Join us  

मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2023 11:23 AM

Benefits of Drinking Water in Malasana : तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज सकाळी मलासन करता का ? त्यामुळे या काळात १ ग्लास पाणी नक्की प्या. यातून आरोग्याशी संबंधित अनेक फायदे मिळू शकतात...

योगामुळे शरीर आणि मन निरोगी राहते आणि पाण्यामुळे शरीर रोगमुक्त राहते. परंतु या दोन्ही गोष्टी एकत्रितपणाने केल्यास आपले आरोग्य चांगले राहते. योगासनांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक योगासन योग्य पद्धतीने केल्यास त्याचे फायदे शरीर आणि मनावर झालेले दिसून येतात. 'मलासन' हा देखील एक योगासनांमधील एक उत्तम असा प्रकार आहे. ज्यांना पोटाच्या समस्या आहेत अशा लोकांनी नियमित मलासनाचा (Benefits of Drinking Water in Malasana) सराव केल्यास पोटाच्या अनेक समस्या कमी होतात. 'मलासन' करणं खूपच सोपं आहे मात्र तरीही कोणतंही आसन कसं करावं याची योग्य पद्धत प्रत्येकाला माहित असायला हवी(Is it good to drink water in Malasana?).

मलासन केल्याने पाठीच्या खालच्या भागात म्हणजे हिप्स आणि पेल्विक एरियामध्ये ताण येतो, ज्यामुळे हे अवयव मजबूत होतात. असे रोज केल्याने पोटाचे स्नायू टोन होतात (Malasana to fight constipation: Benefits and the right way to do it) आणि पायाचा घोटा आणि गुडघ्यांमध्ये लवचिकता येते. याशिवाय गॅस आणि अॅसिडीटीसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. डोकेदुखी आणि मायग्रेनपासून बचाव होतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, तणाव कमी होतो, वजन कमी होते आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. तसेच, लघवीतील जळजळ काम होते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. याशिवाय शरीराचे तापमान (Top 5 Health benefits of Malasana Garland Pose) नियंत्रणात राहते, शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते आणि नवीन पेशी (The Health Benefits of Malasana : Garland Pose) आणि स्नायू तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते. त्यामुळे मलासन करता करता पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक व्याधी बऱ्या होण्यास मदत मिळते. आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका दिलराजप्रीत कौर यांनी पाणी पित पित मलासन करण्याचे अनेक फायदे सांगितलेले आहे(Top 5 Health Benefits of Malasana).

मलासनामध्ये बसून पाणी पिण्याचे नेमके कोणते फायदे होतात ? 

१. हायड्रेशन :- चांगले आरोग्य राखण्यासाठी तसेच थकवा आणि स्नायूमध्ये येणारे क्रॅम्प टाळण्यासाठी, योगा करताना हायड्रेटेड राहणे महत्वाचे असते. मलासना योगा करताना पाणी पिऊन हे सर्व फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात.

२. शरीराची लवचिकता वाढवते :- मलासन हे नितंब आणि कंबरेभोवतीच्या अवयवांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. हायड्रेटेड राहिल्याने या भागांमधील  लवचिकता वाढते, ज्यामुळे ही योग मुद्रा करणे सोपे जाते. 

ट्रेडमिलवर चालावे की बाहेर मॉर्निंग वॉक ? फिट राहण्यासाठी नेमकं काय आहे फायदेशीर...

तुम्हाला पण वर्कआऊट पूर्वी चहा पिण्याची सवय आहे का ? चहाची तलफ लागलीच तर चहाला उत्तम पर्याय...

३. पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत होते :- मलासनाची स्क्वॅट पोझिशन आणि पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि आसन करताना होणाऱ्या समस्या टाळता येतात. या स्थितीत बसल्याने आतड्याची हालचाल जलद होते आणि सकाळी पोट सहज साफ होते.

४. डिटॉक्सिफिकेशन :- हायड्रेशन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि मलासनाच्या वेळी पाणी पिऊन हा फायदा मिळू शकतो. 

५. स्नायू चांगले काम करतात :- जेव्हा शरीर चांगले हायड्रेटेड राहते तेव्हा स्नायू चांगले काम करतात. तसेच, मलासन करताना पाणी प्यायलायने स्थिरता आणि संतुलन राखण्यास मदत होते. 

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

मलासन करण्याची योग्य पद्धत :- 

१. सर्वातआधी योगा मॅटवर सरळ उभे राहा. २. पाय सरळ ठेवत पोट आतमध्ये घ्या. ३. खांदे ताणून घ्या आणि दीर्घ श्वास घ्या. ४. हात जोडून नमस्कार करा. ५. श्वास सोडत गुडघे दुमडून खाली बसा. ६. पायांच्या जांघेमध्ये ताण येईल अशा पद्धतीने दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने ताणून घ्यावेत. ७. या स्थितीत राहून पाणी प्यावे.( योगा करताना थोडे थोडे पाणी प्या. एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. स्वतःला हायड्रेटेड ठेवा, परंतु योग करण्यापूर्वी किंवा दरम्यान जास्त पाणी पिणे टाळा.)८. दीर्घ श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीत यावे. 

दिवसभरात १०,००० पाऊले चालले म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोकाच नाही, तज्ज्ञ सांगतात असं तुम्हाला वाटत असेल तर...

मलासन हा स्क्वाटचा एक प्रकार आहे. ज्यामुळे नितंब सुडौल होतात आणि पोटाच्या समस्या दूर होतात. जर आपण पहिल्यांदाच मलासनाचा सराव करणार असाल तर भिंत किंवा एखाद्या गोष्टीचा पाठीला आधार घ्या. सरावाने आधाराशिवाय तुम्ही मलासन योग्य पद्धतीने करू शकता.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स