वजन कमी करणे (Weight Loss) हे अनेकांसाठी टास्क झाले आहे. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला जमेलच असे नाही. वजन वाढलं की त्यासोबत अनेक आजारही शरीराभोवती घेराव टाकतात. त्यामुळे वेळीच वजन कमी करणं गरजेचं आहे. काहींचे हातपाय सडपातळ पण पोटच वाढत जाते.
पोट आणि कंबरेभोवती साचलेली चरबी फक्त खराब दिसत नसून, गंभीर आजारांना देखील कारणीभूत ठरते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. काही जण जिममध्ये तासंतास घाम गाळतात, तर काही डाएटकडे विशेष लक्ष देतात. पण व्यायाम आणि डाएट करूनही जर पोटाची चरबी कमी होत नसेल तर, ५ फायबरयुक्त भाज्या खा. यामुळे नक्कीच पोटाची चरबी घटेल(Top 5 Vegetables To Include In Your Diet To Burn Belly Fat).
बेली फॅट कमी करण्यासाठी खा ५ भाज्या
गाजर
द हेल्थ साईट. कॉमच्या मते, गाजराचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. मुख्य म्हणजे यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते, व फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे बेली फॅट कमी करण्यास मदत होते. नियमित गाजर खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारते, यासह शरीरात जमा होणारी अतिरिक्त चरबीही कमी होते.
हातपाय सडपातळ पण पोट वाढतच चाललंय? खाऊन पाहा कडीपत्त्याची पानं, काही महिन्यात पोट सपाट
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि क्रोमियम सारखे पोषक घटक आढळतात, जे पोटाची चरबी जाळण्यास मदत करतात. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. नियमित ब्रोकोली खाल्ल्याने उलट सुलट पदार्थ खाण्याची क्रेविंग्स कमी होते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, व वजनही कमी करण्यास मदत होते.
भोपळा
पोट-कंबरेच्या भोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी आपण भोपळा खाऊ शकता. भोपळ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, शिवाय फायबर जास्त प्रमाणात असते. आहारात भोपळ्याचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
वजन कमी करायचं? मग खा सिमला मिरची! - वजन कमी करण्याचा एकदम सोपा आणि असरदार इलाज
पालक
पोटाची चरबी कमी करण्यासाठी पालक खाणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज यांसारखे अनेक पोषक घटक असतात. नियमित पालक खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. आपण पालकाची भाजी, सूप किंवा पराठे तयार करून खाऊ शकता.
दुधीभोपळा
दुधीभोपळ्याचा रस किंवा भाजी खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. दुधीभोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, व कॅलरीजचे प्रमाण कमी असते. सकाळी रिकाम्या पोटी दुधीभोपळ्याचा ज्यूस प्यायल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय आरोग्याला अनेक फायदे मिळतात.