पोट आणि मांड्यांची चरबी जास्त वाढल्यामुळे महिलांना आपले फेव्हरेट कपड्यांची फिटींग व्यवस्थित बसत नाही. या दोन भागांवरचे फॅट शरीराचा शेप बिघडवू शकतात. ही चरबी कमी करण्यासाठी काहीजण जीमला जातात तर काहीजण योगा सेशन्सला जातात. (How Can I Slim My Thighs and Stomach) पोट आणि मांड्याची चरबी कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारेच योगा करायला हवेत, याबाबत फिटनेस एक्सपर्ट जूही कपूर यांनी अधिक माहिती दिली आहे. (Top Three Exercises for Slimmer Thighs And Belly)
एक्सपर्टच्यामते, ''वाढतं वय, डाएट आणि खराब लाईफस्टाईल, कमकुवत मेटाबॉलिझ्म, जेनेटिक्स कारणांमुळे पोट, मांड्यांवर चरबी जमा होते. ज्यामुळे महिला फारच त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामाबरोबरच डाएटवर लक्ष देण्याची गरज असते. लाईफस्टाईलमध्ये करून आणि भरपूर झोप घेऊन तुम्ही हा त्रास टाळू शकता.''
हाय नीज
हा एक असा कार्डिओ व्यायाम आहे ज्यामुळे वेगाने वजन कमी होऊ शकते. हा व्यायाम आणि केल्यामुळे मसल्स मजबूत होतात. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला एकाच जागी उभं राहून गुडघे वर येईपर्यंत जंप करा. हळूहळू स्पीड वाढवा. दोन्ही पाय जोडून सरळ उभे राहा. नंतर कोपर वाकवून क्रॉस करा. एकदम सरळ असायला हवा. नंतर डावा गुडघा ९० अंशात मोडून पाय वर उचला. हा व्यायाम करताना शरीर वरच्या बाजूने झुकवू नका.
चपातीऐवजी 'हा' पदार्थ खाऊन जया किशोरींनी घटवलं वजन; १५ दिवसांत वेट लॉस करण्याचे सिक्रेट
साईड लंजेस
हा एक सोपा पायांचा व्यायाम आहे जो तुम्ही घरी किंवा इतर कुठेही असताना कुठेही करू शकता. यामुळे पायांचे मसल्स टोन राहतात. या व्यायामाला स्कंदासन नावाने ओळखले जाते. हिप्स आणि मांड्यावर व्यवस्थित दबाव येतो.
साध्या आहारातून प्रोटीन-कॅल्शियम हवंय? सकाळी उठल्यानंतर खा ५ पदार्थ: एनर्जेटिक-फिट राहाल
गॉडेस पोज
हा व्यायाम पोट आणि मांड्याची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे पायांचे मसल्स टोन्ड होतात. याव्यतिरिक्त ओव्हरी आणि ब्लॅडरसाठीही फायदेशीर ठरते. यामुळे श्वासांशी निगडीत समस्याही दूर होतात. रोज हे व्यायाम केल्याने ताण-तणावही दूर राहतो.