Join us  

अंगात रक्त कमी झालंय? ५ व्हेज पदार्थ रोज खा, हिमोग्लोबिन वाढेल; अशक्तपणा होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 1:47 PM

Top Hemoglobin Foods That can Increase your Hemoglobin : जेवणासह चहा किंवा कॉफी घेऊ नका.  भिजवलेले, अंकुरलेले आणि आंबवलेले धान्य आणि शेंगा खाल्ल्याने लोहाचे शोषण सुधारते.

प्रोटीन्स आणि कॅल्शियमप्रमाणेत आयर्नही शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. आयर्नच्या कमतरतेनं शरीरात रक्ताची कमकरता भासू शकते. यामुळे एनिमिया हा आजार होतो. यामुळे  कमकुवतपणा, थकवा येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, डोकेदुखी, चिडचिडपणा, चक्कर येणं, यांसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात. (Top Hemoglobin Foods That can Increase your Hemoglobin Naturally)

 शाकाहारी पदार्थही लोहाचा चांगला स्त्रोत आहेत. भारतातील प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी शरीरातील रक्त वाढवत असलेल्या काही पदार्थांबद्दल माहिती दिली आहे.  जेवणासह चहा किंवा कॉफी घेऊ नका.  भिजवलेले, अंकुरलेले आणि आंबवलेले धान्य आणि शेंगा खाल्ल्याने लोहाचे शोषण सुधारते. डाळी आणि क्विनोआ सारखे पदार्थ अमीनो ऍसिड लायसिनने भरलेले असतात, ज्यामुळे लोहाचे शोषण वाढू शकते.

बीट

बीटात लोहाचे प्रमाण भरपूर असते. रोजच्या आहारात बीटाचे सेवन केल्यास एनिमियासारखे रक्ताच्या कमतरतेनं होणारे आजार बरे होतात. १०० ग्राम बीटात ०.८ मिलिग्राम आयर्न असते.

डाळींब

डाळिंब तुमचा ब्लड काऊंट वाढवण्यासाठी सगळ्यात चांगलं फळ आहे. यात आयर्न, व्हिटामीन ए, सी आणि ई मोठ्या प्रमाणात असते. यातील एस्कॉर्बिक एसिड रक्ताचे प्रमाण नियंत्रित करू शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढवते. डाळिंबाचा आहारात समावेश केल्यानं हिमोग्लोबिन वाढते. रोज १ ग्लास डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्यास तब्येत  सुधारण्यास मदत होते.

सफरचंद

दिवसातून एक सफरचंद खाणं हा आजारांना दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यात अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. सफरचंद हा लोहाचा समृद्ध स्रोत आहे. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवण्यासाठी ओळखले जाते. लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज किमान एक सफरचंद खाणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात करा ताज्या आंब्यांची आंबा पोळी; वर्षभर टिकेल, अजिबात दातांना चिकटणार नाही

पालक

हिमोग्लोबिनची कमतरता असताना पालकाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. पालकामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. अनेकांना पालकाची भाजी खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही पालकाचे सूप, स्मूदी  किंवा पराठे खाऊ शकता.

उन्हाळ्यात रोज दही खाताय? 3 त्रास असतील तर चुकूनही दही खाऊ नका, तब्येत सांभाळा

अंजीर

व्हिटॅमिन ए, बी1, बी2, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मँगनीज, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन अंजीरमध्ये आढळतात. रात्री दोन अंजीर पाण्यात भिजवून, सकाळी त्याचे पाणी पिऊन अंजीर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स