Join us  

स्तनांचा आकार वाढवण्याच्या ४ टिप्स; शरीर दिसेल सुडौल-सुंदर, अघोरी-भलतेसलते उपाय मात्र टाळा..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 4:26 PM

Top Natural Ways to Increase Breast Size (breast size vadhavnyache upay) :बेस्ट साईज वाढवण्यासाठी तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम केल्याने मसल्स गेन होण्यास मदत होते.

ब्रेस्ट साईजचा अनेक महिलांना कॉम्प्लेक्स असतो. (Breast Size) त्यात जाहिराती, सिनेमा, यातून असे समज पसरवले गेलेले आहेतच की सुडौल आणि भरगच्च छाती म्हणजे महिला सुंदर. अनेकींना तर प्रश्न पडतो की आपले स्तन लहान असतील तर आपण बाळाला दूध नीट पाजू शकू का? चुकीच्या समजूतींमुळे अनेकींचा आत्मविश्वासही कमी (Top Natural Ways to Increase Breast Size) मात्र हे सारे चुकीचे समज मनातून काढून टाकले पाहिजे. सुंदर दिसणं, सेक्सचा आनंद ते स्तनपान यापैकी काहीच स्तनांच्या आकारांवर अवंबलून नसते. स्तनांचा आकार किती वाढेल हे शरीरयष्टी, आपले जिन्स आणि आहार व्यायाम यावर वयात येण्याच्या दिवसातच अवलंबून असते.(How To Increase Breast Size) त्यामुळे स्तनांचा आकार वाढवण्यासाठी अघोरी आणि चुकीचे उपाय न करता कामा नये. काही सोपे, आरोग्यासाठी उपयुक्त आणि अपाय न होणारे उपाय मात्र तुम्ही करुन पाहू शकता. (How To Increase Breast Size Naturally)

स्तनांना योग्य आकार येण्यासाठी रोज व्यायाम करा

बेस्ट साईज वाढवण्यासाठी तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम केल्याने मसल्स गेन होण्यास मदत होते. याशिवाय स्तनांच्या पेशींचा विकास चांगला होतो. पुशअप्स, चेस्ट प्रेस व्यायाम, कोबरा पोज किंवा वॉल प्रेस हे व्यायाम तुम्ही घरी सुद्धा करू शकता. रोज अर्धा ते एक तास हे व्यायाम केल्याने ब्रेस्ट साईज वाढण्यास मदत होईल.

पोट सुटलंय, व्यायामाला वेळ नाही? बेडवर पडल्या पडल्या ३ योगासनं करा-पोट होईल एकदम फ्लॅट

प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहार घ्या

मसल्स वाढवण्यासाठी प्रोटीन इन्टेक वाढवणं गरजेचं असतं. प्रोटीन पूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असते. खासकरून मांसपेशींच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. प्रोटीन इन्टेक वाढल्याने स्तनांचे मसल्स वाढतात आणि ब्रेस्ट साईज वाढण्यास मदत होते. तुम्ही दूध, दही, पनीर अशा पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. प्रोटीनयुक्त डाएट तुमची पर्सनॅलिटी सुधारण्यात मदत करतो. 

दुधापेक्षा दुप्पट कॅल्शियम देतील ८ पदार्थ; प्रोटीन-कॅल्शियम भरभरून मिळेल, हाडं होतील बळकट

ब्रेस्ट ऑईलने मसाज

जर तुम्हाला स्तनांचा आकार वाढवायचा असेल तर नियमित स्तनांची मालिश करा. ब्रेस्ट मसाज केल्याने मांसपेशींत रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. यामुळे स्तनांचे मसल्स वाढतात आणि हळूहळू आकार वाढू लागतो. नारळाचे तेल, तिळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, कॅस्टर ऑईलने मसाज करू शकता. तेल व्यवस्थित कोमट गरम करून  हाताला लावून या तेलाने स्तनांची मसाज करा. 

एस्ट्रोजनयुक्त पदार्थ खा

ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी एस्ट्रोजनयुक्त पदार्थांचे सेवन करा. हे पदार्थ  एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हार्मोनल स्तर वाढवतात. ज्यामुळे स्तनांचा विकास होतो. इस्ट्रोजनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. आळशी, सोयाबीन- प्रोडक्ट्स, तीळ, टोफू, नट्स, सी फूड, बडिशेप अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. 

टॅग्स :स्तनांची काळजीमहिलास्त्रियांचे आरोग्यफिटनेस टिप्स