शरीराला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पोषक तत्वांची आवश्यकता असते. प्रथिने हा शरीरासाठी एक अत्यावश्यक घटक आहे जो स्नायू तयार करण्यासह अनेक महत्त्वाच्या कार्यात मदत करतो. जेव्हा तुम्ही प्रथिनांचा विचार करता तेव्हा सर्वात पहिली गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे अंडी आणि चिकनसारखे मांसाहारी पदार्थ. (Protein Sources for Vegans and Vegetarians) पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर हा अत्यावश्यक घटक कसा पूर्ण करायचा? सामान्यतः असे मानले जाते की प्रथिनांचे मुख्य स्त्रोत मांस-आधारित पदार्थ आहेत. यात पूर्णपणे तथ्य नाही. (How to get protein without eggs protein sources for vegetarians)
अभ्यासातून असे दिसून आले आहे की शरीराला आवश्यक असलेली प्रथिने अनेक वनस्पती-आधारित पदार्थांचे सेवन करून सहज मिळवता येतात. अशा स्थितीत शाकाहारी लोकांनी फार काळजी करण्याची गरज नाही. अनेक प्रकारची फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही प्रोटीन मिळवू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते सप्लिमेंट्स आणि पावडरपेक्षा आहारातून प्रथिने मिळवण्यावर जास्त लक्ष द्यायला हवे. माहीत करून घ्या अशा पदार्थांविषयी, ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला ही पोषकतत्वे मिळू शकतात.
पांढरे चणे
आहारात पांढऱ्या हरभऱ्याचा समावेश करणे विशेषतः शाकाहारी लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. 100 ग्रॅम चण्यापासून 19 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. हे वनस्पती-आधारित खाद्यपदार्थ आपल्या दैनंदिन प्रथिनांच्या गरजा सहज पूर्ण करू शकतात. प्रोटीन व्यतिरिक्त, पांढऱ्या हरभऱ्यामध्ये सुमारे 12 ग्रॅम फायबर असते, जे तुमची पचनशक्ती राखण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते. पांढऱ्यासह काळा हरभरा देखील प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, त्याला अंकुरित करणे आणि त्याचे सेवन करणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते.
हिरवे मटार
मटार शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन्सचा एक चांगला स्रोतही मानले जातात. प्रथिनांच्या व्यतिरिक्त, हिरव्या वाटाण्यांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. त्यात अनेक रोगांचा धोका कमी करणारे गुणधर्म आहेत. मटारचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
बदाम
शरीराचे चांगले आरोग्य ठेवण्यासाठी दररोज मूठभर ड्रायफ्रुट्स खाण्याची शिफारस केली जाते. यामध्ये बदाम खाणे देखील तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. बदाम हे प्रथिने, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. बदाम सालासकट खाल्ल्यास जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळू शकतात. बदामाशिवाय काजू, अक्रोड यापासूनही प्रथिने मिळू शकतात. सुक्या मेव्यांचा आहारात समावेश करण्याची सवय लावा.