प्रोटिन्सच्या कमतरतेनं अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. यामध्ये मांसपेशी कमकुवत होणं, इम्यूनिटी कमी होणं आणि शरीराचा विकास थांबणं अशा अनेक बाबींचा समावेश आहे. (What vegetarian foods are high in protein) प्रोटीन्सची कमतरता टाळण्यासाठी आहारात प्रोटिन्स रिच फूड्सचा समावेश करा. प्रोटिन्स एक महत्वाचे पोषक तत्व आहे. जे मसल्सच्या विकासाव्यतिरिक्त शरीराच्या अनेक कार्यांना चालना देते. (Top Vegetarian Protein Sources)
प्रोटिन्सच्या कमतरतेनं शरीराच्या वेगवेगळ्या अंगाना नुकसान पोहोचतं. ज्यामुळे इम्यूनिटी कमकुवत होते. संक्रमणाचाही धोका वाढतो. प्रोटिन्स कमी झाल्यानं हाडं कमकवत होतात. केस गळायला सुरूवात होते. नखं पांढरी दिसू लागतात. प्रोटिन्सच्या कमतरतेनं कोणत्या गंभीर समस्या उद्भवतात आणि रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यान प्रोटीन्स वाढतात समजून घेऊ. (High-Protein Vegetarian Recipes)
क्वाशियोरकर
हा आजार शरीरातलं प्रोटीन कमी झाल्यानंतर उद्भवतो. यामुळे पोट आणि पायांमध्ये सूज, केस पातळ होणं, त्वचेच्या रंगात बदल अशी लक्षणं जाणवतात.
एडीमा
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार हा रोगामुळे शरीरात द्रव पदार्थांचे निर्माण होते. ज्यामुळे पायांना सूज येते आणि वजन वाढणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात.
हाय प्रोटीन्स रिच फूड्स (High protein rich food)
डेअरी उत्पादनं
पनीर, दही यांसारख्या पदार्थांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. एक कप दूधात जवळपास ८ ग्राम प्रोटीन असते.
डाळी आणि बीन्स
बीन्स, डाळी या भाज्यांमधून प्रोटीन्सबरोबरच फायबर्स आणि व्हिटामीन्स, मिनरल्ससुद्धा शरीराला मिळतात.
नट्स आणि बीया
बदाम, शेंगदाणे, सुर्यफुलाच्या बीया प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. मूठभर बदामात जवळपास ६ ग्राम प्रोटीन्स असतात.
टोफू आणि सोया उत्पादनं
टोफू आणि सोया उत्पादनं प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. अर्धा कपमध्ये जवळपास १० ग्राम प्रोटीन्स असतात.
क्विनोआ
हा प्रथिने आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे. तुम्ही ते तुमच्या हिरव्या भाज्यांमध्ये मिसळून खाऊ शकता. जर आपण प्रथिनांच्या प्रमाणाबद्दल बोललो तर एक कप क्विनोआमध्ये 8 ग्रॅम प्रथिने असतात.
चणे
एक कप उकडलेल्या हरभऱ्यामध्ये 16 ग्रॅम प्रथिने असतात. तुम्ही कच्चे चणे खाऊ शकता किंवा भाज्यांमध्येही याचा समावेश करू शकता. (पोट आणि मांड्या खूप सुटल्या, जाडजूड दिसता? ६ पदार्थ रोज खा, घटेल चरबी लवकर)