Join us  

प्रवासात मळमळ- उलट्यांचा त्रास होतो? १ सोपा उपाय, मोशन सिकनेस लगेचच होईल कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 8:09 AM

How to Control Motion Sickness: असा त्रास सुरू झाला की प्रवासाच्या सगळ्या आनंदावरच विरझण पडते. म्हणूनच हा एक उपाय करून बघा.

ठळक मुद्दे थोडा- फार त्रास असेल तर हा उपाय करून बघायला हरकत नाही.

प्रवासाची आवड तर अनेकांना असते. पण प्रवास सुरू झाला की लगेचच काही वेळात मळमळ सुरू होते. डोकं दुखू लागतं. काही जणांना तर खूप उलट्या होतात. त्रास एवढा वाढतो की कुठून प्रवासाला निघालो, असं होऊन जातं. ज्यांना त्रास होतो, ते तर वैतागलेले असतातच, पण त्यांच्या सोबतचे प्रवासीही त्रासून जातात. त्यामुळे मग कुणालाच प्रवासाचा आनंद मिळत नाही. यालाच आपण गाडी लागणे किंवा मग मोशन सिकनेस (Ayurvedic solution for controlling motion sickness) म्हणतो. हा त्रास महिलांमध्ये जरा जास्तच प्रमाणात जाणवतो. 

 

असा त्रास होऊ नये म्हणून yoginisrishti या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मोशन सिकनेस कमी करण्यासाठी एक आयुर्वेदिक आणि ॲक्युप्रेशर यावर आधारित एक उपाय सुचविण्यात आला आहे.

लहान मुलांमध्ये वाढतेय गोवरचे प्रमाण.. ५ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष नको, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

हा उपाय करून पाहण्यासाठी तुमच्या उजव्या हाताच्या मनगटाखाली चार बोटांचा गॅप सोडून त्याच्या खाली डाव्या हाताची बोटे दाब देत देत गोलाकार फिरवा. एखादा मिनिट हा उपाय केल्यास मोशन सिकनेस लगेचच कमी होईल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

 

हा उपाय केल्याने मळमळ,  प्रवासामुळे होणारी डोकेदुखी हा त्रासही कमी होईल. थोडा- फार त्रास असेल तर हा उपाय करून बघायला हरकत नाही.

त्वचा होईल उजळ आणि पिंपल्स गायब! गुळाचा फेसपॅक- पाहा सुंदर त्वचेचा सिक्रेट फॉर्म्युला 

पण त्रास खूपच जास्त प्रमाणात होत असेल, तर अशावेळी घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार गोळ्या- औषधी घेणे कधीही अधिक उत्तम.  

टॅग्स :फिटनेस टिप्सट्रॅव्हल टिप्सघरगुती उपाय