Lokmat Sakhi >Fitness > प्रवासात असताना झटपट वर्कआऊट कसं करायचं? वाचा आलिया भटच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

प्रवासात असताना झटपट वर्कआऊट कसं करायचं? वाचा आलिया भटच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

Fitness Tips by Anushka Parwani: असं खूपदा होतं की व्यायामाला वेळच मिळत नाही. अशावेळी झटपट वर्कआऊट कसं करायचं, याविषयी आलिया भटची तसेच करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांनी दिलेल्या या काही खास टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 08:07 AM2022-11-23T08:07:38+5:302022-11-23T13:18:55+5:30

Fitness Tips by Anushka Parwani: असं खूपदा होतं की व्यायामाला वेळच मिळत नाही. अशावेळी झटपट वर्कआऊट कसं करायचं, याविषयी आलिया भटची तसेच करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांनी दिलेल्या या काही खास टिप्स..

Travel workout or quick workout tips by Alia Bhatt's fitness trainer Anushka Parwani | प्रवासात असताना झटपट वर्कआऊट कसं करायचं? वाचा आलिया भटच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

प्रवासात असताना झटपट वर्कआऊट कसं करायचं? वाचा आलिया भटच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

Highlights हा व्यायाम केल्यामुळे शरीराला असणारी रोजची  व्यायामाची सवय मोडली जाणार नाही. एनर्जी लेव्हल कायम राहण्यास मदत होईल.  

सध्या प्रत्येकाचंच रुटीन एवढं व्यस्त झालं आहे की अनेक जणांना ठरवूनही व्यायामाला वेळ मिळत नाही. किंवा काही जणांना कामानिमित्त नेहमीच प्रवास (Travel workout tips) करावा लागतो. मग प्रवास असला की त्या धावपळीत व्यायामात खंड पडतो. मग पुन्हा व्यायामाचं रुटीन सुरू करण्यात पुढचे काही दिवस निघून जातात. त्यामुळेच गडबडीत असताना (quick workout tips if you don't have time for exercise) किंवा प्रवासात असतानाही शरीराची व्यायामाची सवय मोडू नये, यासाठी थोडं- फार झटपट होईल असं वर्कआऊट करणं गरजेचं आहे.(Fitness Tips by Anushka Parwani)

 

या झटपट वर्कआऊटमध्ये नेमका किती आणि कसा व्यायाम करायला पाहिजे, याविषयी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांनी एक व्हिडिओ शेअर करून माहिती दिली आहे. काही दिवसांपुर्वी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिनेही गडबडीत असताना ती कसा व्यायाम करते, याविषयी माहिती देणारी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. त्यात ती म्हणाली होती की गडबडीत असतानाही ती १० सुर्यनमस्कार, कपालभाती प्राणायाम, दिर्घश्वसन आणि मेडिटेशन असे व्यायाम करते. आता बघूया अनुष्का परवानी या नेमकं कोणतं वर्कआऊट सुचवत आहेत. 

 

अनुष्का परवानीने सुचवलेला व्यायाम
१ ते २ मिनिटे जंपिंग जॅक्स करा, त्यानंतर तिने खांदे आणि पाठीचा कणा यांच्या स्ट्रेचिंगसाठी जो व्यायाम सांगितला आहे तो १० वेळा करावा, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर १० वेळा स्क्वॅट्स, १० वेळा जम्प स्क्वॅट्स, १० वेळा इंच वॉर्म्स आणि जमत असल्यास  एखादा मिनिट शिर्षासन करण्याचा सल्ला अनुष्का परवानी देत आहे. हा व्यायाम केल्यामुळे शरीराला असणारी रोजची  व्यायामाची सवय मोडली जाणार नाही. एनर्जी लेव्हल कायम राहण्यास मदत होईल.  

Web Title: Travel workout or quick workout tips by Alia Bhatt's fitness trainer Anushka Parwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.